कासव sakal
पुणे

Pune : वरवंड येथे कासवाला पकडून खाण्याच्या उद्देशाने चुलीवर जिवंत जाळल्याची घटना

वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी माहिती दिली

अमर परदेशी, वरवंड

वरवंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे कासवाची शिकार करून खाण्याच्या उद्देशाने त्याला चुलीवर जिवंत भाजून जीवे मारून कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.याप्रकरणी बापलेकावर वनगुन्हा दाखल करून त्यांना शिताफीने अटक करण्यात आली. नाना धर्माजी सावंत व दादा नाना सावंत ( रा.वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.

याबाबत दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी माहिती दिली. तालुक्यातील वरवंड येथे भरलोकवस्तीत एकाठिकाणी कासव पकडून चुलीवर जिवंत जाळत असल्याची गोपनीय माहीती वनविभागाला मिळाली.वनपरिमंडल शीतल खेंडके व वनरक्षक शीतल मेरगळ यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली. वनाधिकारी शीतल खेंडके व वनरक्षक मेरगळ यांनी वनकर्मचार्यना घेऊन घटनास्थळी धाड मारली.

त्यावेळी आरोपी सावंत यांनी कासवाचे तुकडे करून शिजविण्याच्या उद्देशाने एका भांड्यात ठेवल्याचे आढळून आले.वनाधिकारी यांनी ते तात्काळ ताब्यात घेतले.कारवाईची माहिती मिळताच संबधीत ठिकाणी मोठा जमाव जमला. यावेळी दौंड परिक्षेत्रातील अतिरिक्त वनबंदोबस्त पाचारण करण्यात आला.

दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.रात्री उशिरा दोघांवर भारतीय वन्यजीव अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील,सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT