पुणे

कोट्यवधींची फसवणूक करणारी महिला जेरबंद

CD

पुणे, ता. २१ : रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री राजेश तुडयेकर (वय ४२, रा. बेळगाव) या महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, अन्य फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग नावाने कार्यालय सुरू करून आरोपी तुडयेकर हिने गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते. एक लाखापासून १०० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष तिने दाखवले होते. गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी ३० टक्के रक्कम शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवली जाते आणि ७० टक्के रक्कम सुरक्षित ठेवली जाते, असा विश्वास तिने गुंतवणूकदारांना दिला होता. मात्र, परतावा न देता तिने अनेकांची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..............

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्‍या
तरुणाला कोथरूडमध्ये अटक
पुणे, ता. २१ : कोथरूड परिसरातील केळेवाडी भागात दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम देवेंद्र साळुंखे (वय २१, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यातील अंमलदार शकील पठाण आणि शिवप्रसाद दहिफळे यांना याबाबत माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर घुले आणि पथकाने संशयास्पदरीत्या थांबलेल्या साळुंखे याला ताब्यात घेतले
.....................
एआरएआय टेकडीवरील
खुनाचा दोन तासांत छडा
पुणे, ता. २१ : कोथरूडमधील एआरएआय टेकडीवर झालेल्या १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांनी मैत्रीतून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड असे खून झालेल्‍या मुलाचे नाव आहे. बुधवारी (ता. १९) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात त्‍याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटविणे कठीण होते, मात्र पोलिस अंमलदार दत्ता सोनावणे यांनी केलेल्या तपासणीत तो श्रावणधारा वसाहतीतील असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून दोन अल्‍पवयीनांना ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत दोन्ही अल्पवयीन मुलांनी खुनाची कबुली दिली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT