corona beed corona
पुणे

पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण

सम्राट कदम

शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीयंटने बाधित पहिल्या रुग्णाची पुष्टी झाली आहे.

पुणे- शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीयंटने बाधित पहिल्या रुग्णाची पुष्टी झाली आहे. जिल्ह्यात आजवर एकूण सहा रूग्ण आढळले असून, त्यातील एक रूग्ण शहरातील असल्याचे, महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरीयंटचे ६६ रूग्ण आढळले असून, त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आढळलेला रुग्णाला कोणतेही लक्षणे नसून, त्याला जुलै महिन्याच्या सोळा तारखेला कोरोनाची बाधा झाली होती. संबंधित रुग्णाला रुग्णालयातही दाखल करण्याची गरज पडली नाही. तसेच त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. शहरात आता कोरोनासंबंधीचे निर्बंध उठविण्यात येत असतानाच, डेल्टा प्लस व्हेरीयंटचा रूग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रूग्ण जळगाव (१३) मध्ये आहे. आढळलेल्या ६६ रुग्णांपैकी १० रुग्णांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहे. तर आठ जणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाच्या एकूण प्रमाणापैकी पुन्हा कोरोनाची लागण झालेल्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

शहरात सापडलेला डेल्टा प्लसचा रुग्णाला महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. आता त्याची प्रकृती स्थिर असून, नागरिकांनीही विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. कोविड संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे., असं सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले.

..म्हणून अल्फा, बिटा व्हेरीयंट

जनुकीय बदल करत राहणे हे विषाणूंच्या जीवनक्रमाचा भाग आहे. त्यामुळे त्याचे व्हेरीयंट येतच राहणार. फक्त आपण त्यातले किती शोधतो हा प्रश्न आहे. पूर्वी जो देश असे नवे व्हेरियंट शोधेल त्या देशाचे नाव त्या व्हेरियंटला दिले जायचे.(उदा. युके व्हेरीयंट, दक्षिण आफ्रिका व्हेरीयंट आदी) परंतू, असे नाव दिल्यामुळे त्या देशाची बदनामी व्हायला लागली, म्हणून आता अल्फा, डेल्टा आदी ग्रीक अक्षरांचे नाव दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT