fraud esakal
पुणे

Pune Fraud : मॉडेलिंग क्षेत्रात काम देण्याच्या आमिषाने युवक-युवतींची फसवणूक

मॉडेलिंग क्षेत्रात दररोज पाच ते सहा हजार रुपये कमवा, अशी सोशल मीडियावर जाहिरात करून युवक-युवतींची फसवणूक केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉडेलिंग क्षेत्रात दररोज पाच ते सहा हजार रुपये कमवा, अशी सोशल मीडियावर जाहिरात करून युवक-युवतींची फसवणूक केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत आरोपींनी २३ युवक-युवतींची ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बिपिन रासने (रा. कोथरुड) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी सोशल मीडियावर ‘मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फॅशन डिझायनर, छायाचित्रकारांना मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी’ अशी जाहिरात केली होती. तसेच, दररोज पाच ते सहा हजार रुपये मिळतील, असे सांगितले.

त्यानुसार काही युवक-युवती त्यांच्याकडे गेले. त्यावेळी कंपनीत तीन महिन्यांसाठी चार हजार ४२५ रुपये आणि दोन वर्षांसाठी १७ हजार रुपये भरावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना भुसारी कॉलनीत एका स्टुडिओत बोलाविण्यात आले. त्यांनी २१ मार्चपासून काम सुरू होणार असल्याची बतावणी केली.

परंतु त्यानंतर कंपनी आर्थिक अडचणीत असून, कंपनीला काम मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आतापर्यंत २३ युवक-युवतींनी तक्रार अर्ज दिले असून, त्यांची ४४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT