pune crime news 
पुणे

"तुम्ही २० लाख द्या मी ५ कोटी देतो, त्यासाठी फक्त..."; पुण्यातल्या महिलेला करायला लावली अजब गोष्ट!

Sandip Kapde

Pune Crime News: पाण्याच्या टाकीत पैसे टाका 20 पट करून देतो असे सांगत पुण्यातील महिलेला 20 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. रूममध्ये धूर करून पूजा करतो तसच 20 लाखांचे 12 दिवसात 5 कोटी होतील या अमिषाला महिला बळी पडली.

पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेतील ही घटना आहे. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीवरून तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी अशा 4 जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला रिअल इस्टेटचे काम करतात. तक्रारदार महिलेच्या व्यवसायामध्ये आणखी एक भागीदार आहेत. या दोघांची एका व्यवहारात तनवीर पाटील नावाच्या व्यक्तीशी भेट झाली होती. तनवीर पाटीलने फिर्यादी महिलेला एका गुरुजीच्यामाध्यमातून पैसे 20 पट करण्याची कल्पना सांगितली.

तनवीर पाटील याने तक्रारदार महिलेची एका भोंदूबाबाशी भेट घडवून आणली. यावेळी भोंदूबाबांचे नाव आनंदस्वामी असे सांगण्यात आले. यावेळी 20 लाखांचे पाच कोटी करतो असे भोंदूबाबांने सांगितले. यावर महिलेने विश्वास ठेवत पैशांची सोय करण्याचे सांगितले. तक्रारदार महिलेने ओळखीच्या व्यक्तीकडून 20 लाख रुपये घेतले.

13 सप्टेंबरला रात्री तनवीर पाटील आणि दोन जण महिलेच्या घरी गेले. त्या दोघांचे नाव शिवम गुरुजी आणि सुनिल राठोड असे सांगण्यात आले.

शिवम गुरुजी याने 200 लिटरच्या बॅरेलमध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले आणि त्यानंतर त्या रूमची लाईट बंद करून त्या ठिकाणी आरोपींनी धूर केला. तक्रारदार महिलेला रूमच्या बाहेर काढले.

त्यानंतर 10 मिनिटानंतर तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड यांनी तक्रारदार महिला आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना सांगितले की हरिव्दार येथे जाऊन पूजा करतो. पूजा केल्यानंतर 20 लाखाचे 5 कोटी होती. यासाठी 12 दिवसांचा कालावधी लागेल.

25 सप्टेंबरला 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर महिलेने तनवीर पाटील यांना फोन केला. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महिलेला संशय आला त्यांनी पाण्याची टाकी उघडून बघितली तर त्यात पैसे नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  (Latest Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT