पुणे

इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार

CD

पुणे, ता. २० : इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे महापालिका प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे कार्यालयीन कामासाठी आणि स्थळभेटीसाठी रेल्वे, पीएमपी बस, मेट्रो किंवा कारपुलिंगला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पश्चिम आशियातील तणावामुळे वाढलेल्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काटकसरीचा सल्ला दिला होता. यानुसार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताफा कमी केल्यानंतर आता पुणे महापालिकेनेही हे पाऊल उचलले आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही बस, मेट्रो आणि रेल्वेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, प्रशासन पातळीवरही यासंदर्भात चर्चा सुरू होती.
दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी बुधवारी प्रशासनाला वाहनांच्या वापराबाबतचे निर्देश दिले. आठवड्यातील किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्थळभेटीसाठी जाताना कारपुलिंगचा वापर करण्यास प्राधान्य देऊन वाहनांचा वापर कमी करावा, असेही सांगण्यात आले.
मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच इतर ठिकाणी कार्यालयीन कामासाठी प्रवास करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एसटी बस आणि रेल्वेचा वापर करावा. याशिवाय बैठक, प्रशिक्षण किंवा चर्चासत्र प्रत्यक्ष आयोजित करण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर भर द्यावा, अशाही सूचना नायर यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Natural Reservoir Bursts : ‘बिकट परिस्थितीतून नेपाळी सैन्याने वाचविले’; नेपाळी सैन्याच्या मदतीची नागरिकांनी केली प्रशंसा

Nasrapur Crime : सारोळा गावात थरार! पत्नीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून; आरोपी पतीला अटक

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळने नाकारली बचाव पथकांची मदत; नेपाळी सुरक्षा पथकांकडून शोध सुरूच

Truck Bike Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा मृत्यू; आई गंभीर

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळमध्ये जलप्रलय! नैसर्गिक जलाशय फुटला; नेपाळ-चीन सीमेवरील भागांना पुन्हा पुराचा धोका

SCROLL FOR NEXT