पुणे

सार्वजनिक वाहतुकीला इंधन दरवाढीचा फटका

CD

पुणे, ता. १५ ः इंधनाच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ झाल्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील डिझेल बसगाड्या आणि राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या गाड्यांचा दैनंदिन खर्च कमालीचा वाढणार आहे.
या दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे बजेट कोलमडणार असून, याचा अप्रत्यक्ष बोजा प्रवाशांवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या २१७ बस या पूर्णपणे डिझेल इंधनावर धावतात. या बससाठी पीएमपीला दरमहा सुमारे १ लाख ८० हजार लिटर डिझेलची आवश्यकता भासते. पूर्वी ‘पीएमपी’ला प्रति लिटर ९०. ८३ रुपये दराने डिझेल उपलब्ध होत होते. मात्र, आता ३ रुपयांची वाढ झाल्यामुळे डिझेलचा दर प्रति लिटर थेट ९४ रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे पीएमपी प्रशासनाला दरमहा तब्बल ५ लाख ४० हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाला रोज सुमारे ५ लाखांचा फटका सहन करावा लागणार आहे.
-----------
एसटीच्या ६१० बसगाड्या
पुणे विभागात ६१० बसगाड्या या डिझेलवर धावतात. यासाठी रोज ५० हजार लिटरपेक्षा अधिक डिझेलची आवश्यकता असते. यासाठी पुणे विभागाचा डिझेलवर होणारा दैनंदिन खर्च हा सुमारे ४५ ते ५० लाख इतका आहे. दरवाढ झाल्याने हा खर्च प्रति दिन सुमारे पाच लाख रुपयांनी वाढेल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे लवकरच एसटीच्या तिकिटात दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT