G20 Summit  sakal
पुणे

Pune G20 Summit 2023 : च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट

परदेशी पाहुण्यांनी जाणून घेतला इतिहास

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी लालमहाल, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस आदी वारसास्थळांना बुधवारी भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.

शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले.

परिसरातील जुने वडाचे झाड पाहण्यासाठी आवर्जुन काही क्षण त्यांनी त्याठिकाणी घालवले. नोंदवहीमध्ये शनिवार वाडा अत्यंत सुंदर, भव्य आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी नोंदविली. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले.

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला, तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली. अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

अजित आपटे आणि संदीप गोडबोले यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर, वारसा स्थळ जतन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.

आगाखान पॅलेसला भेट

तसेच जी-२० प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसला ही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली. त्यांनी गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य याबाबत माहिती विचारली. नीलम महाजन यांनी त्यांना याबाबत तसेच पॅलेसचे ऐतिहासिक महत्व विषयी माहिती दिली. यावेळी पाहुण्यांनी चरखा बाबतही माहिती जाणून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आवेश खानच्या अतिउत्साहाने फिरवलं असतं रिषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; पण SRH च्या चूक लक्षातच आली नाही अन्...

29 वर्षाचे रजनीकांत 16 वर्षांच्या अभिनेत्रीशी करणार होते लग्न; ‘त्या’ एका अपशकुनामुळे तुटली स्वप्नांची दोरी!

Pune Sex Racket Bust : पुण्यात चाललंय काय? नामांकित कॉलेजवळच सुरू होते सेक्स रॅकेट, ४ तरुणींची सुटका, ३ जणांना अटक

सलमानचा अंगरक्षक शेराची हायकोर्टात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी, प्रकरण काय?

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीमुळे सोनं स्वस्त! महिन्यात 13 हजारांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT