पुणे

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त करण्याची मागणी

CD

पुणे, ता. २२ ः आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच ध्वनिवर्धकांसंदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. दरम्यान, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवावर अनावश्यक निर्बंध लादू नयेत आणि उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरे होऊ द्यावेत, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.
आगामी दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयात शनिवारी (ता. २२) सर्वपक्षीय नेते, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, आमदार हेमंत रासने, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रवींद्र माळवदकर, शिवसेनेचे किरण साळी, हेमंत बागूल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवाच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे असल्याचे अमितेशकुमार यांनी नमूद केले. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन प्राणप्रतिष्ठा, विसर्जन सोहळ्यांचे नियोजन करण्यात येणार असून, ध्वनिवर्धकांच्या वापराबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला असून, पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा लाभली आहे. देश-विदेशातून भाविक उत्सवासाठी पुण्यात येतात. त्यामुळे उत्सवावर अनावश्यक निर्बंध लादू नयेत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि सूचना विचारात घेऊनच नियमावली निश्चित करावी.
- हेमंत रासने, आमदार

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १३२ वर्षांची परंपरा आहे. उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा, लेझर दिव्यांच्या अतिरेकाचा वापर टाळला पाहिजे. विधायक काम करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. उत्सव काळानुरूप बदलत गेला असला, तरी नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उत्सवाचा उत्साह कायम ठेवत तो निर्बंधमुक्त वातावरणात साजरा व्हावा.
- रवींद्र माळवदकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT