पुणे, ता. २६ : महापालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता, रस्ते व खड्डे दुरुस्ती, झाडांच्या फांद्या छाटणे यांसारखी कामे तातडीने पूर्ण करावीत. महावितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना जादा वीज बिल आकारू नये तसेच पोलिसांनी पूर्व भागातही भाविकांना गणपती बघण्यासाठी जाता येईल, अशी व्यवस्था करावी, अशा मागण्या गणेशोत्सव मंडळांनी ‘सकाळ’च्या बैठकीत मांडल्या. संबंधित मागण्यांची पूर्तता व्हावी, अशी आग्रही मागणीही मंडळांनी केली.
गणेशोत्सवात मंडळांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. खराब रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. देखावे पाहण्यासाठी पेठांमध्ये भाविकांची गर्दी होते. त्याचवेळी नागनाथ पार चौक ते खजिना विहीर चौकापर्यंत अवजड वाहने व अन्य वाहने नियमांचे उल्लंघन करत उलट्या दिशेने येतात. तेथे पोलिसही नसतात. त्यामुळे कोंडी होऊन भाविकांची अडचण होते. त्यामुळे तेथे वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी मंडळांनी केली. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे उचकटलेली असून त्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे प्रकाश व्यवस्थेत अडथळा येतो. मिरवणुकीतही रथावरील देखाव्यांना अडचण होते. विविध परवानग्यांसाठी महापालिकेकडे सतत फेऱ्या माराव्या लागतात, हे प्रश्न दूर करण्यासाठी ‘सकाळ’ने महापालिकेकडे पाठपुरावा करावा.
पूर्व भागात जाणारे रस्ते बंद करू नये
गणेशोत्सव मंडळांना दिला जाणारा तात्पुरत्या विद्युत पुरवठ्यासाठी जादा बिलाची आकारणी केली जाते. मंडळांना जादा बिल परवडत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज बिल कमी येईल, यादृष्टीने उपाययोजना करावी. भाविकांना पूर्व भागातील मंडळांनी केलेले देखावे पाहता येत नाहीत. पोलिस प्रशासनाकडून पूर्व भागात जाणारे रस्ते बॅरिकेडिंग करून बंद केले जातात. याबाबत उपाययोजना करावी. पोलिसांनी गर्दीचे नियोजन करावे, भाविकांना देखावे पाहण्यापासून वंचित ठेवू नये, अशीही मागणी मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.