पुणे, ता. १५ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा पथारी व्यावसायिकांविरोधात कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना मंडई परिसरात घडली. या प्रकरणी एका महिलेसह तिघांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद जक्शी वाघिरे (वय ३०), निशा घनश्याम वाघिरे (वय २५) आणि रामजी घनश्याम वाघिरे (वय २२, तिघेही रा. महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट, जुना मुंबई-पुणे रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी नीलेश चव्हाण (वय ४३, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील बेकायदा पथारी व्यावसायिकांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे. रविवारी (ता. १३) रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा फुले मंडई परिसरातील गोटीराम भय्या चौकात पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्या वेळी वाघिरे यांनी कारवाईला विरोध केला. कारवाईदरम्यान जप्त केलेला माल पालिकेच्या वाहनात ठेवला होता. आरोपींनी वाहनातील जप्त माल रस्त्यावर फेकून दिला. तसेच अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी अजय भिसे यांना लाथ मारून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.