पुणे

उद्या पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीत बदल

CD

वाघोली, ता. २० ः वाघोली परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. मिरवणुकांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंगळवारी (ता. २२) दुपारी ३ वाजल्यापासून बुधवारी (ता. २३) पहाटे २ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी काढले आहेत.
पर्यायी मार्गाचा अवलंब करून गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाचा दिवस शांततेत पार पडावा आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नागरिकांनी, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन भाजीभाकरे यांनी केले. त्याचबरोबर, मंगळवारी विसर्जनाचा नववा दिवस आल्याने आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, दैनंदिन बाजार दुपारी तीन वाजल्यानंतर बंद राहणार आहे. पुणे महापालिकेने याबाबतचे पत्र काढले आहे.

ट्रॅव्हल्स बस, जड वाहतुकीसाठी
- पुण्यातून नगर रस्तामार्गे छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस यांनी सादलबाबा चौक चंद्रमा चौक-विश्रांतवाडी-आळंदी शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.
- नगर रस्त्याने मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस यांनी शिक्रापूर चाकणमार्गे मुंबई या मार्गाचा वापर करावा. नगर रस्त्याने पुणे शहरात येणाऱ्या बसेस यांनी लोणीकंद येथून थेऊर फाटा केसनंद गावमार्गे थेऊर फाटा सोलापूर रस्ता मार्गाचा वापर करावा.

हलक्या चारचाकी वाहनांसाठी
- अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने ही थेऊर फाटा, लोणीकंद गाव, केसनंद, थेऊरगाव, थेऊर फाट्यावरुन सोलापूर रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जातील.
- पुण्याकडून शिरुर, अहिल्यानगरकडे जाणारी वाहने वाघेश्वर चौकातून डावीकडे वळून भावडीगांव मार्गे, पुणे अहिल्यानगर महामार्ग सुरभी माथा (लोणीकंद) या ठिकाणाहून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT