Pune Ganesh Visarjan Esakal
पुणे

Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जन लांबले, मिरवणुकीला आणखी ३ ते ४ तास लागण्याची शक्यता

दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात कालपासून विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यावर गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. तर पुण्यात अद्याप मिरवणुका सुरूच आहेच. मानाच्या गणपतींचे काल उशिरा विसर्जन पार पडले. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

काल साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आसपास विसर्जन देखील पार पडले. त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजाराम यासारख्या मंडळांची मिरवणूक खुप उशिराने सुरू झाली. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीनंतर या मंडळांऐवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक दीड वाजल्यानंतर देखील सुरु झाली नाही. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला. तर पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला संपायला अजून ३ ते ४ तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजून २०० मंडळांचे गणेश विसर्जन बाकी आहे.(Latest Pune News)

लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या मंडळांचा हा आकडा आहे. पुण्यातील गणेश मिरवणूक रेंगाळला जाण्याची शक्यता आहे. तर पोलिसांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडले त्यामुळे आता फक्त पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Chandrakant Patil : भाजपकडून आधुनिक पुण्याची जडणघडण; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

Shivsena MNS Manifesto : पुणेकरांसाठी ‘ठाकरेंचा शब्द’; ठाकरे शिवसेना-मनसेतर्फे वचननामा जाहीर

Nylon Manja : हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! बंदी असूनही सर्रास विक्री अन् वापर; कठोर कारवाईची गरज

Supreme Court: नोकरीचं स्वप्न भंगलं? सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेतलं म्हणून...; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल केला रद्द

SCROLL FOR NEXT