ganesh visarjan sakal
पुणे

पुणे : कोथरुडमध्ये विसर्जन स्थळी गर्दीला उधाण

गणेशाला निरोप द्यायला आलेल्या गर्दीचे उधाण सायंकाळी चार नंतर विसर्जन स्थळी संध्याकाळच्या सुमारास दिसत होते.

सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : बाप्पाला निरोप देताना आपली हजेरी हवीच या भावनेतून सहकुटूंब, सहपरिवार, मित्रांसह गणेशाला निरोप द्यायला आलेल्या गर्दीचे उधाण सायंकाळी चार नंतर विसर्जन स्थळी संध्याकाळच्या सुमारास दिसत होते. सकाळी विसर्जनासाठी येणारांची संख्या कमी होती. दुपारनंतर हळुहळु गर्दी वाढु लागली. कोरोना निर्बंधांचे पालन होईल याकडे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, पोलिस यांचा कटाक्ष होता. तर भाविक सुध्दा  मास्कचा वापर करत विसर्जन विधीत सहभागी होताना दिसत होते.

कोथरुड बावधन क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत १९ मुर्ती व निर्माल्य संकलन केंद्रे तसेच १० फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. घरगुती गणपती विसर्जनासाठी ९००० किलो पावडरची व्यवस्था कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाने केली होती. पहिल्या आठ दिवसात ४८७५ व्यक्ती आणि ११५ गणपती मंडळांना ही पावडर वाटण्यात आली. उर्वरीत पावडर विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी वाटण्यात आली.

कोथरुडमध्ये गांधीभवन, शांतीबन चौक, जीत मैदान, स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, थोरात उद्यान, भारती विद्यापीठ कन्याशाळा, सुतारदरा हजेरी कोठी, लोढा पेट्रोल पंप, मयूर कॉलनी, तेजस नगर आदी भागात विसर्जन हौद तसेच सोसायटी व वस्ती विभागात फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT