Pune University Square Sakal
पुणे

गणेशखिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक पोलिसांकडून वाहतुकीत बदल, गुरुवारपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील (Pune University) चौकामध्ये होणाऱ्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम (Development) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. 23 डिसेंबरपासून प्रयोगिक तत्वावर हा बदल करण्यात आला आहे.

शहरातील प्रस्तावित मेट्रो मार्गावर ट्रायल रन घेण्यात येणार आहे. त्यासाठी चतुःशृंगी वाहतूक विभागाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये 23 डिसेंबर पासुन प्रायोगिक तत्वावर पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे बदल करण्यात येणार आहे.

असा आहे वाहतुक बदल

1) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, पाषाण रस्ता - पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालय - अभिमानश्री पाषाण चौक -अभिमानश्री बाणेर चौक - बाणेर रस्ता सकाळनगर - यशदा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक असा रस्ता एकेरी मार्ग करण्यात आला आहे. शिवाजीनगर कडुन विद्यापीठ चौक येथुन बाणेर व पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी वरील मार्गाचा वापर करावा.

- पाषाणकडुन पुणे विद्यापीठ चौक येथे जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री पाषाण चौकातुन डावीकडे वळुन बाणेर रस्त्यावर येऊन पुणे विद्यापीठ चौक येथील रस्त्याचा वापर करावा.

2) - गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बॅंक शेजारील भोसलेनगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहने भोसलेनगरमधून जाण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. भोसलेनगर मधुन मुख्य गणेशखिंड रस्त्यावर येणेकरीता रेंजहिल्स रस्त्याचा वापर करावा.

-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक- पाषाण रस्ता - पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय - अभिमानश्री पाषाण चौक अभिमानश्री बाणेर धौक बाणेर रस्ता सकाळनगर यशदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक अशा मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुस थांबण्यास किंवा वाहने पार्कींग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

-अभिमानश्री बाणेर चौक ते सायकर चौक रस्त्याचे दोन्ही बाजुलाही थांबण्यास किंवा वाहने पार्कींग करण्यास मनाई करण्यात आली

-अभिमानश्री बाणेर चौक ते सायकर चौक या मार्गावर अवजड वाहनांना सकाळी 7 ते रात्री अकरावाजे पर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

- औंध येथील राजीव गांधी पुल ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक रस्त्याच्या दोन्ही बाजुस नो पार्कींग करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

अक्षय कुमारच्या अभिनयक्षेत्रातील गुरु असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन ; ८ ७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Uttrakhand : कुंभमेळ्यासाठी हरिद्वारमध्ये निर्माण केले जाणार नवे शहर; ३२ सेक्टर, एक पोलिस स्टेशन आणि एक रुग्णालयाचा असेल समावेश

Dhule News : दिवाळीत प्रवाशांना दिलासा! धुळे एसटी विभागाचा 'मेगाप्लॅन': ७३० बसेसद्वारे विशेष वाहतूक नियोजन

PCOS and Pregnancy Diabetes: PCOS आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याच्या शक्यतेचा काय आहे संबंध? जाणून घ्या उपाययोजना

SCROLL FOR NEXT