Ganpati Sakal
पुणे

Ganeshotsav 2022 : पुण्यात ऐन गणेशोत्वात रंगणार 'सत्तांतराचा' खेळ

सकाळ डिजिटल टीम

Pune Ganeshotsav 2022 : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्वत संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार असून, राज्यभरात पुण्यातील देखावे बघण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त पुण्यात दाख होत असतात. एवढेच काय तर, पुण्यातील देखाव्यांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत असते. त्यात काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत मविआ सरकार पायउतार झाले. त्यानंतर नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्त्वात आले. या सर्व घडमोडींची संपूर्ण देशाने दखल घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातील गणेशोत्वव काळात या सत्तातराचा खेळ पाहण्यास मिळणार आहे.

नरेंद्र मंडळ साकारणार सत्तांतराचा देखावा

यंदा पुण्यात गणेशोत्वादरम्यान अनेक मंडळं वेगळ्या पद्धतींचे देखावे सादर करणार आहेत. मात्र, या सर्वांमध्ये नरेंद्र मंडळाच्या देखाव्याची चर्चा गणपती उत्सवाआधीच सुरू झाली असून, यंदा हे मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्ता मंथनाचा देखावा सादर करणार आहे.

सध्या या देखाव्याची अंतिम तयारी प्रसिद्ध कलाकार सतीश तारू यांच्या कारखान्यावर सुरू आहे. देखाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हुबेहुब मूर्ती साकारण्यात आल्या असून, हा देखावा भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास मंडळाच्या कार्याकर्त्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, ODI: पाऊस सुरू असताना भारताचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय करत होते? BCCI नेच शेअर केलाय Video

Pune Traffic: विश्रांतवाडी चौक ते फुले नगर रस्त्यावरचा बीआरटीमार्ग काढून टाकण्याचा निर्णय; पीएमपीचा विरोध मनपाने झुगारला

T20 Mumbai Women's League: सोबो मुंबई फाल्कन्सला सायली सातघरेच्या नेतृत्वात विजेतेपद! मुंबई वेस्टर्न सबर्ब्स फायनलमध्ये पराभूत

Dhiraj Seth: भारताला मिळाले नवे लष्करप्रमुख! कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ?

Ambassador Job: सरकारी नोकरी नाही, थेट राजदूत बनण्याची संधी! सरकारची महत्त्वाची घोषणा; नेपाळमध्ये मोठी हालचाल, कुणाला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT