ganeshotsav sakal
पुणे

Pune Ganeshotsav : सर्वाधिक दणदणाट मंडईत

‘एमपीसीबी’कडून पहिली नोंद; कोथरूड दुसऱ्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवातील पहिल्याच दिवशी सर्वाधिक दणदणाट महात्मा फुले मंडई परिसरात झाल्याची पहिली नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केली. कोथरूड येथील शिवाजी पुतळ्याजवळ शहरातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आवाज नोंदविण्यात आला.

गणेशोत्सवात पुण्यातील कोणत्या भागात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत आहे, याची अचूक नोंद करण्याची प्रक्रिया ‘एमपीसीबी’ने सुरू केली आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या १८ ठिकाणी व्यवस्था केली आहे. राज्यातील २२ शहरांमधून १३२ ठिकाणी ध्वनिप्रदूषणावर देखरेख करणारी यंत्रणा मंडळाने निर्माण केली आहे. त्याअंतर्गत पहिल्या दिवशीच्या ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी झाल्या, त्यातून ही माहिती पुढे आली.

कोरोनानंतर गेल्या वर्षी प्रथमच गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला. २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने राज्यात गणेशोत्सव साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवातील दणदणाट वाढल्याचे निरीक्षण ‘एमपीसीबी’ने नोंदविले.

राज्यातील शहरा-शहरांमधील कार्यकर्त्यांच्या उत्साहाबरोबरच आवाजाची पातळीही वाढण्याचे अधोरेखित झाले होते. या वर्षीही राज्यातील प्रमुख शहरांमधील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीवर देखरेख करण्याचा प्रकल्प ‘एमपीसीबी’ने हाती घेतला आहे. त्यासाठी खासगी संस्थेचीही मदत घेतली आहे. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून राज्यातील आवाजाच्या नोंदी घेण्याची सुरुवात झाली आहे, अशी माहिती ‘एमपीसीबी’ने दिली.

कधी देखरेख होणार?

गणेशोत्सवातील आवाजाची पहिली नोंद मंगळवारी (ता. १९) घेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (ता. २२), सोमवारी (ता. २५) आणि गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी गुरुवारी (ता. २८) नोंदी घेण्यात येणार आहेत.

कुठे होणार नोंदी?

शांतता, औद्योगिक आणि निवासी क्षेत्र अशा तीन ठिकाणी सकाळी आणि रात्री होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली जाईल. मुंबईपाठोपाठ पुण्यात नोंदी घेण्याची व्यवस्था केली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाजाची निश्चित पातळी ठरवलेली आहे, त्या नियमांचे पालन गणेश मंडळांनी करावे. त्यामुळे नागरिकांना वाढलेल्या आवाजाच्या पातळीचा त्रास होणार नाही.

- नितीन शिंदे,

प्रादेशिक अधिकारी,

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : प्रभाग रचनेवर आता रडत बसू नका; निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

Mumbai Local: २००हून अधिक लोकल फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; रेल्वे प्रशासनाची योजना काय?

Latest Marathi News Updates : ढगाळ वातावरणात कोसळणार पावसाच्या सरी, मुंबईत हवामान विभागाकडून पावसाचा इशारा

Ahmadpur News : टाकळगाव येथील तरुणाचा मराठा आरक्षण आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत उपोषणस्थळी मृत्यू

Vishal Tate Exclusive: शाळेतल्या सरांमुळे कबड्डीची सुरुवात करणारा नांदेडचा विशाल PKL चं मैदान गाजवण्यास सज्ज; वाचा त्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT