पुणे : यंदाच्या गणेशोत्सवाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून एक ते आठ सप्टेंबर दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये दुपारी तीन पासून आवश्यकेतनुसार वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी केले आहे.
• बंद रस्ते
- लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते टिळक चौक
- छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी रस्त्यावरील स.गो. बर्वे ते जेधे चौक
- बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते आप्पा बळंवत चौक
- टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ते हिराबाग चौक
अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदिश गॅरेज उपरस्ता) ते टिळक रोडकडे जाण्यास बंदी.
- अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदिश गॅरेज उपरस्ता) ते टिळक रोडकडे जाण्यास बंदी.
- सणस रस्ता : गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक
• पर्यायी मार्ग
- डुल्या मारूती चौक, दारूवाला पूल, अपोलो टॉकीज पाठीमागील मारणे रस्त्यावरून सिंचन भवन
- शाहीर अमर शेख चौक, कुंभारवेस चौक, म.न.पा. भवन पाठीमागील रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
- हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडी पेठ पोलिस चौकी पुढे शंकर शेठ रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
- शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, रस्ता टिळक चौक टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा
- सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौक मार्गे नेहरु रस्त्याचाचा वापर करुन स्वारगेटकडे जावे
-कुंभारवेस चौक- पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ताड मार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, घोरपडी पेठ उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रस्ता वापरावा.
- पूरम चौक, टिळक चौकातून उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक असा वापरावा
- जेधे चौक, नेहरू स्टेडीयम समोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा, उजवीकडे वळून पूरम चौक, हिराबाग. (पीएमपीएल बस व तीन चाकी रिक्षा वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना येथे बंदी असणार आहे.)
- गोटीराम भैय्या चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, डावीकडे वळून कस्तुरे चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करावा.
- वाहतुकीच्या परिस्थितीनुसार गाडगीळ पुतळ्यापर्यंत येणारी दुचाकी वाहने ही लालमहल पर्यंत सोडण्यात येतील. तेथून दुचाकी वाहनचालकांनी डावीकडे फडके हौद चौकाकडे किंवा उजवीकडील फुटका बुरुजकडून इच्छितस्थळी पुढे जावे
• इथे असेल नो पार्किंग
- शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौक
- मंडई ते शनिपार चौक
- बाजीराव रस्त्यावरील शनिपार ते फुटका बुरूजपर्यंत
- आप्पा बंळवंत चौक ते बुधवार चौक पर्यंत
• इथे असेल पार्किंग
विमलाबाई गरवारे कॉलेज, एच.व्ही. देसाई कॉलेज, मनपा विद्यालय, पुलाची वाडी नदी किनारी, दारूवाला पुल ते खडीचे मैदान, काँग्रेस भवन मनपा रस्ता, व्होल्गा चौक ते मित्र मंडळ चौक, कॅनॉलच्या कडेस, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याची डावी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, सर्कस मैदान, टिळक पुल ते भिडे पूल नदी किनारी, नारायण पेठ हमालवाडा पार्कींग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.