Gautam Dandekar sakal
पुणे

Key Watch : डिजीटलच्या युगात चावीच्या घड्याळांना सुरू ठेवणारा अवलिया

बदलत्या काळानुसार घड्याळं पण बदलत राहिली, चावीच्या घड्याळांची जागा सेलच्या घड्याळांनी घेतली. आता डिजिटल घड्याळं बाजारात आली आहेत.

समाधान काटे

बदलत्या काळानुसार घड्याळं पण बदलत राहिली, चावीच्या घड्याळांची जागा सेलच्या घड्याळांनी घेतली. आता डिजिटल घड्याळं बाजारात आली आहेत.

पुणे - 'जवळपास शंभर वर्षापूर्वी आजोबांनी घेतलेलं सुंदर असं घड्याळ बंद पडल्याने दुरुस्ती अभावी ते अडगळीत पडून होतं. त्याची दुरुस्ती करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी चौकशी केली मात्र, ते दुरूस्त करून मिळालं नाही. नाईलाजाने ते घरी आणून तसंच घरात ठेवलं. एक दिवस आॕनलाईन शोध घेतल्यावर एका व्यक्तीचा नंबर मिळाला आणि अडगळीत पडलेलं घड्याळ दुरूस्त करून मिळालं. आज या घड्याळातून प्रत्येक तासाला संगीत ऐकू येतं. संगीताचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष आमचे आजोबा जिवंत असल्याचा भास होतो. यातून आजोबा घरात असल्याची भावना निर्माण होते. असं सांगत होते. जुन्या वस्तूंशी मानसाच्या भावना गुंतलेल्या असतात.' असा अनुभव सांगत होते, शिवाजीनगर येथील प्रकाश कुलकर्णी.

बदलत्या काळानुसार घड्याळं पण बदलत राहिली, चावीच्या घड्याळांची जागा सेलच्या घड्याळांनी घेतली. आता डिजिटल घड्याळं बाजारात आली आहेत. पुर्वी घरं मोठी होती, त्यामुळे मोठी घड्याळं घरामध्ये ठेवायला सोय व्होयची. सध्या घराची मर्यादा आल्यानं तसेच काळानुसार होत असलेलं डिजीटलायजेशन पाहता चावीच्या घड्याळांची मागणी आणि दुरूस्ती करणारांची संख्या कमी झाली. तरी देखील आवड म्हणून या घड्याळांची दुरूस्त करणारा अवलिया जुन्या आठवणींना उजाळा देऊन, जुनं ते सोनं ही म्हण प्रत्यक्षात उतरवत आहे.

वसंत विहार सोसायटी, कोथरूड येथे राहणारे गौतम दांडेकर यांचे शिक्षण इंटेरियर डिझाईन झालेले मात्र, आवड म्हणून ते वीस वर्षापासून चावीच्या घड्याळांची दुरूस्त घरातूनच करत आहेत. दांडेकर यांनी १८८० ते १९४० पर्यंतची बंद असलेली चावीची घड्याळं दुरूस्त केली आहेत. त्यांच्याकडे जवळपास साडेसातशे जुन्या घड्याळांचा संग्रह आहे. फक्त जुन्याच घड्याळांना दुरूस्त करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे. घरामध्येच मशिनद्वारे घड्याळाचे साहित्य,वेगवेगळे भाग ते बनवतात. भारतातील अनेक राज्यातून घड्याळं दूरूस्तीसाठी त्यांच्याकडे येतात. दांडेकर म्हणाले, जुने घड्याळ दुरुस्त करून मिळाल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतो. ते घड्याळ आपुलकीने जपून ठेवतात.

घड्याळाचे प्रकार

एक चावी घड्याळ : चावी दिली की घड्याळ चालू राहते. साधं घड्याळ कोणतही संगीत किंवा बेल नसते.

दोन चावी घड्याळ : दोन ठिकाणी चावी द्यावी लागते, त्यामुळे घड्याळ सुरू राहते व बेल वाजते.

तीन चावी घड्याळ : घड्याळ सुरू राहते, बेल व संगीत वाजते.

या देशातील घड्याळं

जर्मन, इंग्लंड, फ्रान्स, जपान, अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT