पुणे, ता. ७ : विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षण व उद्योगाभिमुख संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या भूविज्ञान, खनिकर्म संचालनालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. खनिकर्म संचालनालयाने प्रथमच शिक्षण संस्थेसोबत असा करार केला आहे.
या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना भूविज्ञान, खनिज संसाधन व्यवस्थापन, संशोधन, प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, तांत्रिक मार्गदर्शन, तसेच उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळण्याबरोबरच शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यानुभव यांची प्रभावी सांगड घालता येणार आहे. तसेच, शासन आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याचा हा महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात संशोधन, नवोपक्रम, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकासाला या उपक्रमातून चालना मिळणार आहे. यावेळी भूविज्ञान व खनिकर्म विभागाचे उपसंचालक डॉ. सुयोग जगताप, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम मुडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.