Pune German bakery bomb blast case female doctor Evidence sakal
पुणे

पुणे : बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकला; पण प्रत्यक्ष पाहिलं नाही

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात महिला डॉक्टरची साक्ष

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात बेकरीजवळ क्लिनिक असलेल्या एका महिला डॉक्टरची मंगळवारी साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. ‘मी बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकल्यानंतर धावत खाली गेले आणि लोकांची सुटका करण्यासाठी मदत करू लागले. मात्र मी प्रत्यक्ष घटना घडताना पाहिले नाही,’ असे त्यांनी न्यायालयात सांगितले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याच्याविरोधात विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि ५६ जण गंभीर जखमी झाले होते. बेकरीत भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे सीसीटीव्हीवरून निष्पन्न झाले होते. त्यानंतर यासीन भटकळ, मिर्झा हिमायत बेग यांच्यासह सात जणांवर एटीएसने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सोमवारी सर्व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेण्यात आले आहेत. यासीन भटकळतर्फे बाजू मांडण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ॲड. एस. व्ही. रणपिसे आणि ॲड. यशपाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणात भटकळ याच्या सहभागाबाबत बचाव पक्षातर्फे साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत जर्मन बेकरीच्या मालक स्मिता खरोसे यांच्यानंतर एका महिला डॉक्टरांची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. जर्मन बेकरी परिसरात त्यांचे क्लिनिक होते. जोरदार धमाका झाल्याचा आवाज झाल्यानंतर मी खाली आले आणि लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. बेकरीत आग लागलेली पाहिली नाही, असे डॉक्टरने न्यायालयास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Viral Video: प्रचंड लाटांमध्ये मुलगा वाहून गेला; 16 वर्षीय तरुणाचा थरारक रेस्क्यू कॅमेऱ्यात, समुद्राच्या भीषण लाटांशी झुंज

Latest Live Updates Marathi : संसदेत एनडीएतील पक्षाची 'मंगल मिलन' बैठक सुरू

Koyna Dam Update : 'कोयना' शतकाकडे! धरणात 24 हजार क्युसेकने पाण्याची आवक; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, नवजात 394 मिमी पाऊस

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

SCROLL FOR NEXT