कारवाई sakal
पुणे

घोडेगावमध्ये जुगारावर मोठी कारवाई.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव चा पदभार स्वीकारल्यापासून अवैद्य दारू धंदे व मटका जुगार यावर जोरदार कारवाई सुरू केली आहे.

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव : पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव चा पदभार स्वीकारल्यापासून अवैद्य दारू धंदे व मटका जुगार यावर जोरदार कारवाई सुरू केली आहे. काल घोडेगाव मध्ये जुगारावर मोठी कारवाई करण्यात आली ,मटका घेणाऱ्या इसमासह तिघांवर गुन्हा दाखल झाला असून एकूण 58 हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे दारू धंद्यावाले व मटका जुगार खेळणारे यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक दत्तात्रय जढर यांनी दिली आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंचर भिमाशंकर रोडचे कडेला डोंगरे हॉस्पीटलचे मागे मोकळया जागेत झाडाच्य आडोशाला जगन सहादू असवले हे लोकांकडून पैसे घेवून त्याना चिट्टया देवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळवित असताना रोख रक्कम जुगाराचे साहित्य मोबाईल फोन व मोटारसायकल असा एकूण ५८,१३० रुपयाच्या मालासह मिळून आले आहेत. जगन सहादू असवले व सोमनाथ तुकाराम बांबळे हे तुकाराम काळे यांच्या सांगण्यावरून लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना ही कारवाई झाली आहे. या तीन जनांवर घोडेगाव पोलीस स्टेशनने महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कालेकर हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT