Pune Sakal
पुणे

Velhe Landslide : एसटी 'त्या' खिंडीतून जाण्यापूर्वीच दरड कोसळली अन् अनर्थ टळला !

रस्त्यावर दरड कोसळून रस्ता झाला बंद

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणातील उत्तर बाजूला असलेल्या तीरावर दापसरे व घोल ही गावे आहेत. येथे या गावादरम्यान रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे.

त्यामुळे, एसटी बस घोलकडे जाऊ शकली नाही. दापसर येथील प्रवासी सोडल्यानंतर एसटी घोलकडे निघाली होती. एसटी त्या खिंडीतून जाण्यापूर्वीच त्या ठिकाणी दरड कोसळली होती.

एसटीचे चालक व वाहक व बसमधील प्रवाशांची राहण्याची व जेवणाची सोय दापसरे येथे होती. रस्ता दुरुस्तीसाठी जेसीबीसाठी संपर्क करण्यात आला आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी रात्री दिली आहे.

बुधवारी संध्याकाळी स्वारगेट घोलकडे ‌जाणारी‌‌ एसटी‌‌ची काच फुटली आहे. असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी सकाळी रस्ता दुरुस्तीसाठी जेसीबी आणून रस्त्यातील दर हटवण्याचे काम सुरू आहे अशी माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT