Ishani Bendale
Ishani Bendale Sakal
पुणे

पुण्याची मुलगी देणार जगाला आयुर्वेदिक उपचाराचे पुरावे

सकाळ वृत्तसेवा

आयुर्वेदिक औषधांना जगभरामध्ये आजही त्याच्या गुणकारीपणाचे पुरावे मागितले जातात. पुण्यातील ‘एक’ मुलगी हे पुरावे जगातील प्रगत देशांना आत्मविश्वासाने देणार आहे.

पुणे - आयुर्वेदिक औषधांना (Ayurvedic Medicine) जगभरामध्ये आजही त्याच्या गुणकारीपणाचे पुरावे (Proof) मागितले जातात. पुण्यातील ‘एक’ मुलगी हे पुरावे जगातील प्रगत देशांना (Developed Countries of the World) आत्मविश्वासाने देणार आहे. त्यासाठी ‘तिने’ इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या (Oxford University) ‘एव्हिडन्स बेसड् मेडिसीन’ या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेली ‘ती’ देशातील पहिली मुलगी ठरली आहे. पुण्यातील वैद्य योगेश आणि वैद्य विनिता बेंडाळे यांची कन्या असलेली ईशानी (Ishani Bendale) यांना हा बहुमान मिळाला आहे.

ब्रिटनमधील स्वॅानसी युनिव्हर्सिटीमधून नुकताच वैद्य ईशानी बेंडाळे यांनी ‘नॅनो मेडिसिन’मध्ये ‘एमएससी’चा अभ्यासक्रमही पूर्ण केला. ‘आयुर्वेदातील भस्म’ ही औषधी संकल्पना हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्य ईशानी यांनी आयुर्वेदाची पदवी घेतली. आयुर्वेदाची उपचार पद्धती आजही देशात आणि परदेशांमध्ये पर्यायी उपचार पद्धती मानली जाते. आयुर्वेद हे भारताचे प्राचीन वैद्यकशास्त्र आहे. हजारो वर्षे आपण यातून रुग्णसेवा केली आहे. आजही असाध्य आजार यातून बरे होत आहेत. अशा वेळी केवळ आपल्याकडे आयुर्वेदिक औषधांची गुणकारीता जगाला समजेल अशा भाषेत मांडता न आल्यामुळे हे शास्त्र मागे पडणे योग्य नाही, हा विचार करून ईशानी यांनी ‘एव्हिडन्स बेसड् मेडिसीन’ अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.

आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून पुराव्याधारीत रुग्णसेवेचे मापदंड लावता येतात. या कठोर परीक्षेत आयुर्वेदिक औषधे गुणकारी ठरतात. हे जगापुढे उलगडून दाखविण्यासाठी वैद्य बेंडाळे आता ब्रिटनमध्ये अभ्यासाचे धडे गिरवत आहेत.

आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे, इतका मर्यादित दृष्टिकोनातून या शास्त्रातील नव्या पिढीने याकडे बघायला नको. आधुनिक काळात प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागतात. वैद्यकशास्त्रही त्याला अपवाद नाही. अशा काळात आयुर्वेदालाही जगाला समजेल अशा पद्धतीने मांडण्याची ही वेळ आहे. याची सुरवात ब्रिटनमधून वैद्य बेंडाळे यांनी केली आहे.

लहानपणापासूनच मी आयुर्वेदामुळे असाध्य आजार बरे झाल्याचे डोळ्यांनी बघितले आहे. ही आयुर्वेदाची क्षमता आहे. ती फक्त भारतीयांपुरती मर्यादित न ठेवता जगभरातील लोकांना याची जाणीव करून देण्याची गरज आहे.

- ईशानी बेंडाळे, वैद्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT