Leshpal Javalge 
पुणे

Leshpal Javalge: कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या लेशपालचं राहुल गांधींशी आहे खास कनेक्शन!

पुण्यात मंगळवारी घडलेल्या कोयता हल्ल्यातील तरुणीला MPSCचा अभ्यास करणाऱ्या लेशपाल जवळगे या तरुणानं वाचवलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी घडलेल्या कोयता हल्ल्यातील तरुणीला MPSCचा अभ्यास करणाऱ्या लेशपाल जवळगे या तरुणानं वाचवलं होतं. लेशपालच्या या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. प्रशासनात जाऊन देशासाठी मोठं काम करु पाहणाऱ्या या लेशपालचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत खास कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात. (Pune Girl Student Attack Leshpal Jawalage who saved girl has a special connection with Rahul Gandhi)

राहुल गांधी यांनी १० महिन्यांपूर्वी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेत ते देशातील विविध राज्यांमध्ये पायी फिरत तिथल्या जनतेच्या अडचणी समजून घेत होते. त्यांच्या या यात्रेची देशभरात चर्चा होती.

ज्या ज्या राज्यांमधून ही यात्रा जात होती त्यांच्या या यात्रेत अनेक जण सहभागी होत होते. अशाच प्रकारे लेशपाल जवळगे हा देखील राहुल गांधींच्या या यात्रेत सहभागी झाला होता. ही यात्रा काढण्यामागं देश जोडण्याचा जो विचार होता, तो लेशपालला भावला होता. त्यामुळेच त्यांनं राहुल गांधींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. (Latest Marathi News)

लेशपाल जवळगेनं सांगितलं की, "आम्हाला छान वाटलं होतं की, नेहरु घराण्यातील एक व्यक्ती आपल्या लोकांसाठी पायी चालतोय. पंडीत जवाहरलाल नेहरु आणि राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी जेवढी ताकद लावली गेली तेवढी ताकद जगात कुठल्या व्यक्तीसाठी लागली नसेल.

कन्याकुमारीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत राहुल गांधी चालताहेत हे ऐकून खूप चांगलं वाटलं होतं. देशात सध्या हिंदू-मुस्लीम आणि भेदभावाचं घाणेरडं राजकारण सुरु आहे. याविरोधात काहीतरी करावं असं राहुल गांधींना वाटलं आणि त्यांनी पायी यात्रा सुरु केली. त्यामुळं जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना पाठिंबा देणं हे आपलंही कर्तव्य आहे, असं वाटलं आणि आम्ही त्यात सहभागी झालो" (Marathi Tajya Batmya)

"राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेमुळं लेशपाल जवळगे सारख्या तरुणांना प्रेमानं वागण्याचं प्रोत्साहन आणि धाडस मिळालं," असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान, पुण्यातील या थरारक घटनेनंतर काँग्रेस भवनमध्ये लेशपाल जवळगेचा मंगळवारी जाहीर सत्कारही करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT