सुवर्णकन्या गीता मालुसरे
सुवर्णकन्या गीता मालुसरे Sakal
पुणे

सुवर्णकन्येची उत्तुंग समुद्रभरारी; ३२ किमी अंतर ६ तास २६ मिनिटांत पार

सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट : मुळशीची सुवर्णकन्या गीता मालुसरे हिने आज उत्तुंग समुद्रभरारी घेऊन प्रॅांग्स लाईट हाऊस ते बेलापूर जेट्टी हे ३२ किलोमिटरचे अंतर ६ तास २६ मिनिटात पूर्ण केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात महिला सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी कुमारी गीता महेश मालुसरे हिने ही मोहीम आज पूर्ण केली. गीताने सकाळी आठा वाजता कुलाबा प्रॅांग्स लाईट हाऊस जवळ समुद्रात उडी घेतली आणि पोहायला सुरूवात केली. दुपारी २.३० वाजता बेलापूर जेट्टी जवळ ३२ किलोमीटर हे अंतर तिने ६ तास २६ मिनिटात पोहून पार केले. आज ढगाळ वातावरणात समुद्रात उसळत असलेल्या लाटांना गीता धाडसाने सामोरी गेली आणि ही मोहीम यशस्वी करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला सशक्त महिला, सशक्त भारत हा संदेश गीताने समस्त देशवासीयांना दिला आहे. भारतातील मुली या क्षेत्रातही सक्षम आहेत हे गीताने आज या मोहीमेतून देशवासीयांसमोर ठेवले आहे.

गीता मालुसरे

२०१७ साली गीताने तिच्या १३ व्या वाढदिवसाला मुंबईच्या याच समुद्रात ३२ किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले होते. कोरोनामुळे गेले दोन वर्ष गीताचा पोहण्याचा सराव पूर्ण बंद होता. गेल्या दोन महिन्यात पुन्हा कसून सराव करत गीताने आज ३२ किलोमिटरची समुद्रभरारी घेतली आणि आपल्या भविष्यातील उद्दिष्टपूर्ततेसाठी आपण सज्ज आहोत हे दाखवून दिले आहे. या पूर्वी गीताने राज्य आणि राष्ट्रीय पातळीबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध स्पर्धेमधे यश संपादन केलेले आहे. ती फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेतून बारावीचे शिक्षण घेत आहे. गीताची सध्या बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. आजची ही मोहीम पूर्वनियोजित होती आणि योगायोगाने बारावीच्या दोन पेपरमधे बारा दिवसांचा कालावधी असल्याने ही मोहीम पूर्ण करून ती यशस्वी केली.

राष्ट्रीय कोच शेखर खासनीस यांनी या मोहीमेसाठी गीताला मार्गदर्शन केले. आज त्यांनी स्वत: या मोहीमेत सहभागी होऊन गीताला प्रोत्साहन दिले. त्याबरोबर हर्षद इनामदार हे प्रशिक्षकदेखील सहभागी झाले होते. तनिष कुडले या सहकाऱ्याने काही वेळ गीताला प्रोत्साहन देण्यासाठी स्वीमिंग केले. स्विमींग फेडरेशन ऑाफ इंडीयाच्या मान्यतेने स्वीमिंग असोसिएशन ऑाफ महाराष्ट्रचे निलेश मकवाना यांनी या मोहिमेचे परिक्षक म्हणून काम पाहिले.

या मोहिमेत गीताची आजी शैला, वडील महेश आणि आई दिपा मालुसरे उपस्थित होते. शार्क अॅक्वाटीक क्लब या संस्थेने या मोहिमेचे आयोजन केले होते तर सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी आणि वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशन यांनी या मोहिमेला सहकार्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT