Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : सराफा व्यावसायिकांकडून दागिने व पैशाचा अपहार ; वाडेबोल्हाई येथील प्रकरण

वाडेबोल्हाई येथील सराफा व्यावसायिकाने सोन्याचे दागिने व रोख रक्कमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वाडेबोल्हाई येथील सराफा व्यावसायिकाने सोन्याचे दागिने व रोख रक्कमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन सुभाष क्षिरसागर, ( रा. शिवरकर वस्ती, वाघोली, मुळ रा. कुरंदा, ता. वसमत, जि. हिंगोली ) असे सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने तो व्यवसाय करीत होता. या प्रकरणी अमोल कुंडलीक पायगुडे ( वय 32 वर्षे,रा. पायगुडेवस्ती, वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल व त्यांची आई मालन यांनी नवीन सोन्याच्या बांगड्या बनविण्यासाठी जुन्या पाच तोळे वजनाच्या बांगड्या क्षिरसागर यांना दिल्या. नवीन बांगड्या बनवून देतो असे त्याने सांगितले. बरेच दिवस होवूनही बांगड्या न मिळाल्याने पायगुडे हे दुकानात गेले. मात्र दुकान बंद होते.

त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सरफाने मोबाईल उचलला नाही. सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने व पैशाचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायगुडे यांनी पोलीसात तक्रार दिली. अन्य ग्राहकांच्या पैशांचा अपहार सराफाने केल्याचेही क्षिरसागर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

-नीलेश कांकरीया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात खाकी वर्दीचा धाक उरलाय की नाही? गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना टोळक्याने मारहाण केली अन्...

Mumbai Crime: आईनेच घेतला सहा महिन्यांच्या बाळाचा जीव! धक्कादायक कारण समोर; मुंबईतील संतापजनक घटना

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारी राज्य शासनाला होणार सादर; आयुक्तांनी घेतला आढावा

Mumbai News: सावधान! नाला परिसरात कचरा टाकाल तर कारवाई होणार; प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ishan Kishan: इशानच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावरील २ खेळाडू खेळणार; विराट, मोहम्मद शमीपण त्याच संघात, वैभव सूर्यवंशी स्टँडबाय

SCROLL FOR NEXT