water activities birds sakal
पुणे

Pune News : पक्ष्यी-प्राण्यांसाठी वाटीभर दाणा-पाणी अनोखा उपक्रम आज पासून सुरू

पक्ष्यी-प्राण्यांसाठी वाटीभर दाणा-पाणी देऊ देऊ या ..बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांचा उपक्रम

अशोक बालगुडे

उंड्री : आला उन्हाळा, आता पक्ष्यी-प्राण्यांसाठी वाटीभर दाणा-पाणी देऊ देऊ या...उपनगर आणि परिसरातील विहिरी-बारवा संपुष्टात आल्या. शेती संपली आणि काँक्रिटचे जंगल उभे राहिले. त्यामुळे प्राणी-पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

त्यांना दाणा-पाणी देण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. घराजवळ, खिडकी, गॅलरी आणि टेरेसवर पसरट भांड्यामध्ये पाणी ठेवून चिमणी-पाखरांची तहान भागवू या, असा संकल्प बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी सुरू केला आहे.

हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेज सोसायटीमधील झाडांच्या फांद्या, सोसासयटीची गच्ची, तर काहींनी स्वतःच्या गॅलरीमध्ये चिमणी पाखरांसाठी दाणापाणी देण्याचा संकल्प सुरू केला आहे.

डॉ. पाटील म्हणाले की, डॉ. पाटील म्हणाले की, उन्हाळा सुरू झाला की, सर्वांचीच पाण्यासाठी भटंकती सुरू होते. चिमणी पाखरांची उन्हाळ्यामध्ये तगमग पाहून जीव कासावीस होतो आहे. एक दिवस लावलेला कृत्रिम रंग निघून जाईल मात्र पुढील कित्येक वर्ष प्रेमाचा आणि आपुलकीचा रंग पशुपक्ष्यांना लागत राहील.

या भावनेतून सोसायटीमध्ये असणाऱ्या पक्षांना कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सहजगत्या पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून सुंदर डिझाईनचे स्टॅन्ड व पाण्याचे भांडे सोसायटी परिसरामध्ये लावण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला.

या उपक्रमामध्ये चेअरमन योगेंद्र गायकवाड सेक्रेटरी दिलावर शेख, खजिनदार मधुकर जगताप, संजय पवार, मोहन मोरे, गणेश वाडकर, विवेक मुळे, रोहिदास सायकर, संतोष कारंजकर, अंकुश जाधव, रतन कुंडू, श्रीकृष्ण ताजने, सुनील गव्हाळे, गणेश पाटील, नितेश गद्रे, प्रकाश खांडेकर, वसीम फरास,मधू मेनन, रंजना रणपिसे, नीता जमदाडे युवराज सावंत, संतोष ताकभाते, संदीप घाडगे आणि सभासदांनी या उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

Panchang 30 April 2026 : आजचे पंचांग! नृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

SCROLL FOR NEXT