पुणे

मजुरांसाठी पुणे खात्रीशीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कामाची खात्री असल्यामुळे दर आठवड्याला वेगवेगळ्या शहरांतून तसेच  परराज्यांतून पुण्यात येणाऱ्या मजुरांची संख्या सुमारे तीन ते चार हजार आहे. कुशल, अर्धकुशल, अकुशल अशा सर्व प्रकारच्या कामगारांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी मजुरी करणारे कामगार कामाच्या ठिकाणी राहणे पसंत करतात. मात्र त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता नसल्याने या कामगारांना दुर्घटनेला सामोरे जावे लागत आहे. 

मुंबईनंतर वेगाने वाढणारे शहर म्हणून राज्यात पुणे शहराकडे पाहिले जाते. दरवर्षी शहरात महापालिकेकडून तीनशे ते साडेतीनशे बांधकाम परवानग्या दिल्या जातात. खोदाईपासून प्लंबिंग आणि रंगकामापासून फर्निचरपर्यंतच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कामगारांची गरज भासते. त्यामुळे हमखास रोजगार मिळणार, याची खात्री असल्यामुळे विविध राज्यांतून पुण्यात मजुरी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विशेषत- नातेवाईक अथवा ओळखीने येणाऱ्यांची संख्या यामध्ये जास्त आहे.

बांधकाम मजूर सुरवातीला बांधकाम प्रकल्पावर पडेल ते काम करून तेथेच राहणे पसंत करतात. अशा कामगारांना दरमहा आठ ते दहा हजार रुपये पगार मिळतो. महिला कामगार असेल तर सात हजार रुपये पगार मिळतो. प्रकल्पावर मोफत राहण्याची सुविधेसह पाणी, वीज यांसारख्या अन्य सुविधा मोफत मिळतात. मुलांच्या शिक्षणाचीही सोय होते. कमी अंतरामुळे प्रवासावर होणारा खर्च वाचतो. याउलट कुशल कामगार प्रकल्पावर राहण्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यांना मिळणारा रोज जास्त असल्यामुळे ते एका प्रकल्पावर राहणे पसंत करीत नाहीत. 

शहरात बिहारमधून येणाऱ्या कामगारांची संख्या यापूर्वी मोठी होती. मात्र मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश येथून येणाऱ्या मजुरांची संख्या जास्त आहे, असे बांधकाम ठेकेदार गोपी चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

कुशल कामगारांना वाढती मागणी
विशिष्ट काम हे विशिष्ट राज्यातील कामगार सफाईदारपणे करतात. त्यामुळे अशा कामगारांना मागणीदेखील असते. आरसीसी डिझाईन करणे, आरसीसी कॉलम भरणे, स्लॅब टाकणे यामध्ये पश्‍चिम बंगालचे कामगार कुशल म्हणून ओळखले जातात. वीट बांधकाम, प्लॅस्टर यामध्ये कर्नाटक आणि झारखंडचे कामगार, फर्निचर, रंगकाम, पीओपीच्या कामात राजस्थानी आणि उत्तर प्रदेशातील कामगार कुशल असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांना मागणी असते. भराई, खोदाई, साफसफाई, बांधकामावर पाणी मारणारे कामगार हे तेथेच राहतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT