Raped esakal
पुणे

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडूनच वारंवार बलात्कार

आरोपीने पीडितेचे अपहरण करून मुंबईला नेत तिथेही बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात शेजाऱ्याकडूनच एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेचे अपहरण करून मुंबईला ठेवल्याचीही बाब उघड झाली असून पोलिसांना नराधमाला अटक करत त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Pune Crime News)

पुण्यातील गुलटेकडी परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने १५ वर्षाच्या मुलीला धमकावत वारंवार बलात्कार केला आहे. ही बाब जेव्हा मुलीच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेने गुलटेकडी परिसरात खळबळ उडाली असून सदर आरोपीने पीडितेच्या वडिलांना देखील धमकावल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडितेचे अपहरण करून मुंबईला नेले आणि तिथेही तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं उघड झाल्यानंतर पीडितेने ही बाब पालकांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली असून अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT