Looted cash sakal
पुणे

फिल्मी स्टाईल चोरी; तोतया ED अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याला 60 लाखाला लुटले

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दारुच्या दुकानाचा परवाना देण्याचा बहाणा करुन एका व्यावसायिकाला ६० लाखाला लुटले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दारुच्या दुकानाचा परवाना देण्याचा बहाणा करुन एका व्यावसायिकाची तब्बल साठ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रणजित अरविंद लोहार (रा.माळीनगर, माळशिरस, सोलापुर ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम दुर्गेश गौर व त्याची पत्नी रंजना गौर उर्फ रंजना उपदेशे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्धही यापुर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोघांनाही यापुर्वीच शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांनीच लोहार यांना फसविल्याची माहिती पुढे आली आहे.

रंजना गौर हिची लोहार यांची यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी तिने तिचा पती शुभम हा उत्पादन शुल्क विभागात सहायक आयुक्त असल्याचे सांगून दोघांची ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने लोहार यांना त्याच्याकडील बनावट ओळखपत्र दाखविल्याने त्यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर दाम्पत्याने त्यांना दारु विक्री करण्यासाठी आवश्‍यक एफ.ए.2 हा परवाना मिळवून देऊ असे आमिष लोहार यांना दाखविले.

त्यानंतर त्यांनी मार्च 2020 पासून आत्तापर्यंत त्यांच्याकडून वेळावेळी साठ लाख रुपये उकळले. त्यानंतर त्यांना परवान्याची बनावट कागदपत्रे दिली. लोहार यांनी परवान्याची तपासणी केली, तेव्हा तो परवाना बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. गायकवाड हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT