Pune Half Marathon Photos ESAKAL
पुणे

Pune Half Marathon Photos : पुणे मॅरेथॉनमध्ये 4 वर्षाची झुनैरा शेख झाली झाशीची राणी; मावळ्यांनीही पटकावलं पदक

अनिरुद्ध संकपाळ

Pune Half Marathon Photo : बजाज अलियान्झ पुणे मॅरेथॉन 2023 ला पुणेकरांनी आज (दि. 10 डिसेंबर) प्रचंड प्रतिसाद दिला. पहाटे 5 वाजल्यापासूनच बालेवाडी म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उत्साही पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावण्यास सुरूवात केली होती.

जसजशी 10 डिसेंबरची पहाट पुढे सरकत होती. तसतेसे 21.1 किमी, 10 किमी, 5 किमी अन् 3 किमीची मॅरेथॉन सुरू झाली. काही वेळातच विजेते देखील जाहीर झाले. याचबरोबर यंदाच्या मॅरेथॉनमध्ये पुणेकरांनी केलेल्या विविध वेशभूषेने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बजाज अलियान्झचे कर्मचारी असलेले शेख कुटुंबीय देखील पहिल्यांदाच सहपरिवार पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मात्र ते फक्त सहभागी झाले नाही तर ते त्यांच्यासोबत आपल्या चिमुकल्या झाशीच्या राणाला झुनैराला देखील सोबत घेऊन आले होते.

वसिम शेख यांनी सकाळशी बोलताना सांगितले की, ही त्यांची पहिलीच मॅरेथॉन आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं होतं. झुनैराच्या शाळेत दोन दिवसांपूर्वीच फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडली होती. त्यावेळी ती झाशीची राणी झाली होती. हाच पोषाख घालून आज 4 वर्षाची झुनैरा आज पुणे मॅरेथॉनमध्ये आली होती. तिच्यासोबत तिचा 10 वर्षाचा भाऊ निशाद देखील होता.

यंदाच्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुणेकरांनी पारंपरिक वेशभूषा करत संस्कृती जपण्याचा संदेश दिला. एक मराठमोळा मावळा देखील या मॅरेथॉनमध्ये धावाला अन् त्यानं पदक देखील पटकावलं. या सातारा जिल्ह्यातील कराडमधून आलेल्या मावळ्याचं नाव आहे मोहन दुर्गावळे! याचबरोबर हडपसर येथील मेडिकलचा व्यवसाय करणारे भुराराम चौधरी यांनी बजाज अलियान्झ पुणे मॅरेथॉन 2023 मध्ये पारंपरिक वेशभुषा करत संकृती जपण्याचा संदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

SCROLL FOR NEXT