Pune Half Marathon esakal
पुणे

Pune Half Marathon LIVE : फक्त 17 सेकंदाचा खेळ! अखेर उत्तम पाटीलने मारली बाजी; महिलांमध्ये रेशमा केवटे अव्वल

अनिरुद्ध संकपाळ

Bajaj Allianz Pune Half marathon 2023 Live : बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 21.1 किलोमीटर प्रकारात उत्तम पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 21.1 किलोमीटरचे अंतर 1 तास 5 मिनीटे अन् 4 सेकंदात पूर्ण केले. सुशांत जेधेने दुसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली. सुशांत जेधे आणि उत्तम पाटीलमध्ये फक्त 17 सेकंदाचे अंतर राहिले. सुशांतने 1 तास 5 मिनिटे 21 सेंकद वेळ नोंदवली.

महिलांमध्ये 21.1 किलोमीटरची मॅरेथॉन रेशमा केवटेने जिंकली. तिने 1 तास 13 मिनिटे अन् 18 सेकंद अशी वेळ नोंदवली. 10 किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये महिला विभागात साक्षी जडियालने 36 मिनिटे 52 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर पुरूष विभागात असिफ खानने 30 मिनिटे 25 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.

अन् 4 वर्षाची झुनैरा शेख झाशीची राणी बनून ट्रॅकवर अवतरली

बजाज अलियान्सचे कर्मचारी असलेले शेख हे आपल्या कुटुंबासह पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. ही त्यांची पहिलीच मॅरेथॉन असून त्यांच्या 4 वर्षाच्या मुलीने, झुनैराने झाशीच्या राणीची वेशभूषा केली होती.

पुणे मॅरेथॉनमध्ये मारठमोळ्या मावळ्यानं लक्ष वेधून घेतलं

बजाज अलियान्स पुणे मॅरेथॉन 2023 मध्ये फक्त धावणारे पुणेकरच उपस्थित नव्हते तर आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे मावळे देखील सर्वांच लक्ष वेधून घेत होते.

पुणे मॅरेथॉन - पुणेकर खळखळून हसले

पुणे मॅरेथॉनमध्ये संस्कृती जपण्याचाही संदेश 

हडपसर येथील भुराराम चौधरी यांनी बजाज अलियान्झ पुणे मॅरेथॉन 2023 मध्ये पारंपरिक वेशभुषा करत संकृती जपण्याचा संदेश दिला. ते मेडिकल शॉप चालवतात.

बजाज अलियान्स पुणे हाफ मॅरेथॉन - 10 किमीचे विजेते

महिला विभाग

  • पहिला क्रमांक - साक्षी जडियाल, ३६ मिनिटे ५२ सेकंद

  • दुसरा क्रमांक - रिंकी पावरा, ३७ मिनिटे ०३ सेकंद

  • तिसरा क्रमांक सृष्टी रेडेकर, ३७ मिनिटे ३२ सेकंद

पुरूष विभाग

  • पहिला क्रमांक - असिफ खान, ३० मिनिटे २५ सेकंद

  • दुसरा क्रमांक - शुभम भंडारे, ३० मिनिटे ४० सेकंद

  • तिसरा क्रमांक - अंकुश हक्के, ३० मिनिटे ५५ सेकंद

बजाज अलियान्स पुणे हाफ मॅरेथॉन - 21.1 किमीचे विजेते

महिला विभाग

  • प्रथम क्रमांक - रेशमा केवटे - 1 तास 13 मिनिटे 18 सेकंद

  • द्वितिय क्रमांक - ठाकूर निरमाबेन भारतजी - 1 तास 17 मिनिटे 22 सेकंद

  • तृतीय क्रमांक - लिली दास - 1 तास 20 मिनिटे 16 सेकंद

पुरूष विभाग

  • प्रथम क्रमांक - उत्तम पाटील - 1 तास 5 मिनीटे 4 सेकंद

  • द्वितीय क्रमांक - सुशांत जेधे - 1 तास 5 मिनिटे 21 सेंकद

  • तृतीय क्रमांक - बेलीअप्पा एबी - 1 तास 6 मिनिटे 12 सेकंद

 उत्तम पाटीलने  21.1 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन जिंकली

बजाज अलियान्झ हाफ मॅरेथॉनमधील 21.1 किलोमीटर मॅरेथॉन ही उत्तम पाटीलने जिंकली. त्याने 21.1 किलोमीटरचे अंतर 1 तास 5 मिनीटे अन् 4 सेकंदात पूर्ण केले. महिलांमध्ये 21.1 किलोमीटरची मॅरेथॉन रेशमा केवटेने जिंकली. तिने 1 तास 13 मिनिटे अन् 18 सेकंद अशी वेळ नोंदवली.

21 किलोमीटर पुणे हाफ मॅरेथॉन बक्षीस रक्कम 

  • पहिला क्रमांक (पुरूष आणि महिला प्रत्येकी) - 2,50,000 रूपये

  • दुसरा क्रमांक - 1,25,000 रूपये

  • तिसरा क्रमांक - 75,000 रूपये

  • चौथा क्रमांक - 35,000 रूपये

  • पाचवा क्रमांक - 25,000 रूपये

  • सहावा क्रमांक - 15,000 रूपये

  • सातवा क्रमांक - 12,000 रूपये

  • आठवा क्रमांक - 10,000 रूपये

  • नववा क्रमांक - 10,000 रूपये

  • दहावा क्रमांक- 10,000 रूपये

10 किलोमीटर पुणे हाफ मॅरेथॉनला सुरूवात; अशी आहे बक्षीस रक्कम 

  • प्रथम क्रमांक - पुरूष आणि महिला प्रत्येकी 50,000 रूपये

  • द्वितीय क्रमांक - पुरूष आणि महिला प्रत्येकी 30,000 रूपये

  • तृतीय क्रमांक - पुरूष आणि महिला प्रत्येकी 20,000 रूपये

  • चौथा क्रमांक - पुरूष आणि महिला प्रत्येकी 15,000 रूपये

  • पाचवा क्रमांक - पुरूष आणि महिला प्रत्येकी 10,000 रूपये

बजाज अलियान्स पुणे हाफ मॅरेथॉन : पुणेकरांचा झुंबा डान्स

बालेवाडीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पुणे हाफ मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी पुणेकरांनी झुंबा डान्स करत आपले वॉर्म अप करून घेतले.

पुणे हाफ मॅरेथॉन 5 किलोमीटर बक्षीस रक्कम 

  • प्रथम क्रमांकाने हाफ मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या पुरूष आणि महिलेला प्रत्येकी 10,000 रूपये आणि पदक

  • द्वितीय क्रमांकाने हाफ मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या पुरूष आणि महिलेला प्रत्येकी 7,000 रूपये आणि पदक

  • तृतीय क्रमांकाने हाफ मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या पुरूष आणि महिलेला प्रत्येकी 5,000 रूपये आणि पदक

पुणे हाफ मॅरेथॉन : बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्पेक्समध्ये पुणेकरांची गर्दी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

Vastu Tips : घरात खूप रखरख वाटते? 'या' 5 बिनकामाच्या वस्तू हिरावू शकतात तुमची शांती; खेचतात नकारात्मकता, कुटुंबात सतत वाद

Abhijieet Dipke यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन सुरु

T20 Squad: हार्दिक-कुलदीप आऊट! टीम इंडियाच्या घोषणेनंतर खळबळ; अजित आगरकरांनी सांगितलं संघाबाहेर करण्याचं कारण

Chandrapur: नागभीड तालुक्यात ३०.८७ कोटींचे पीककर्ज वितरण; शेतकऱ्यांना दिलासा; चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा पुढाकार

SCROLL FOR NEXT