हार्मोनल असंतुलन sakal
पुणे

पुणे : हार्मोनल असंतुलन, उपाययोजनांविषयी उद्या वेबिनार

डॉ. सुप्रिया पुराणिक उद्या करणार मार्गदर्शन; झूमद्वारे व्हा सहभागी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या we are in this together या मोहिमेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील किशोरवयीन मुली आणि पालकांसाठी ‘किशोरवयीन मुलींमधील हार्मोनल असंतुलन आणि समस्या व उपाययोजना’ याविषयी शुक्रवारी (२४ सप्टेंबर) दुपारी चार वाजता प्रसिद्ध स्त्रीरोग - प्रसूतीतज्ज्ञ व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक यांचा मोफत मार्गदर्शनपर झूम वेबिनार होणार आहे.

किशोरवयीन मुलींमध्ये आजकाल शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे पीसीओडी किंवा पीसीओएसचे प्रमाण वाढत असल्याचे आढळत आहे. या समस्येमुळे मासिकपाळीची अनियमितता, वजन वाढणे, विवाहानंतर गर्भधारणेमध्ये दोष निर्माण होऊन वंध्यत्व अशा अनेक समस्या उद्‍भवतात. त्यावर वेळीच वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे.

या वेबिनारच्या माध्यमातून खालील बाबींवर मार्गदर्शन होईल.

  • पीसीओडी व पीसीओएसची लक्षणे व समस्या

  • शरीरातील हार्मोनल असंतुलनाची कारणे

  • हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी योग्य जीवनशैली

  • सकस आहाराचे महत्त्व

  • महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचार

सहभागाविषयी...

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक किंवा क्यूआर कोड ओपन करून नोंदणी करू शकता. नोंदणी केल्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.

लिंक : www.waitt.in/register-now/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT