Baramati  Sakal
पुणे

Pune : सुपे परिसरात पावसामुळे हाहाःकार

जनजिवन विस्कळीत, अनेक घरांमध्ये पाणी

सकाळ वृत्तसेवा

सुपे : सुपे परिसरात रात्री झालेल्या पावसाने हाहाःकार माजवला. जमीनी वाहिल्या, शेतीमाल व घरांची पडझड. बंधारे, तलाव तुडूंब. ओढ्यांना पूर आल्याने घनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावांचे रस्ते बंद झाल्याने दळण-वळण बंद झाले आहे. दरम्यान, आज सकाळी महसूल विभागाने ठिकठिकाणी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे सुरू केल्याची माहिती सुप्याचे मंडलाधिकारी लक्ष्मीकांत मुळे, तलाठी नितीन यादव यांनी दिली.

सुप्यात रात्री ९० मिमि पाऊसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ६५६ मिमी पाऊस झाला आहे. या परिसरासाठी हा मोठा पाऊस आहे. बोरकरवाडीचे माजी उपसरपंच दत्तात्रेय कदम म्हणाले - या परिसरात सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री उशिरापर्यंत ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने सुमारे २० घरांमध्ये पाणी शिरले आहे.

तलाव भरून वाहत असल्याने कालची रात्र ग्रामस्थांनी भितीपोटी जागून काढली. येथील श्रीविठ्ठल मंदीराला पाणी लागले होते. जमिनी वाहिल्या, पीके गेली, अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला. ओढ्यांना पाणी असल्याने जनसंपर्क तुटला आहे. पुरंदरच्या गावात पाऊस वाढला तर तलावाला धोका होण्याची भिती कदम यांनी व्यक्त केली.

काऱ्हाटीचे सरपंच बी.के.जाधव म्हणाले - काऱ्हाटीतून बाहेर जाण्यासाठी सुपे,बाबुर्डी व जळगावकडून संपर्क तुटला आहे. अनेक ओढ्यांवरील पुलांची उंची वाढवण्याची मागणी आहे. कऱ्हानदीवर मोठा उंच पुल होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भोंडवेवाडी ते सुपे संपर्क तुटला होता. सकाळी पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत झाली. येथील काही घरांना पाण्याचा वेढा पडला होता. येथील पुलाची उंची वाढवण्याची सरपंच कांतीलाल मेरगळ यांची मागणी आहे.

चांदगुडेवाडीच्या खंडूखैरेवाडीत पाच घरांमध्ये पाणी शिरले आहे तर आठ घरांची पडझड झाल्याची माहिती सरपंच मंगल पारसे यांनी दिली. वढाण्यात पुरामुळे ओढ्यावरील एक पुल वाहून गेल्याची माहिती सरपंच सुनिल चौधरी यांनी दिली.

दिवाळीच्या खरेदीवर परिणामः

कोरोना महामारीनंतर सुप्याची बाजार पेठ दिवाळीसाठी नुकतीच सजली आहे. येथील कापड, फर्निचर, भांडी, किराणा, सराफ व्यवसायीक तयार झाले आहेत. परंतू, पावसामुळे बाजार पेठेत खरेदीला उत्साह नाही. तसेच, शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने येथील शेतीमाल बाजार पेठेवरही त्याचा परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT