सार्वजनिक आरोग्य विभाग sakal
पुणे

पुणे : आरोग्य विभाग भरती पेपर फुटीप्रकरणी एकाला अटक

फुटलेल्या पेपरच्या स्क्रीनशॅाट्समध्ये त्याचे नाव होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली आहे. विजय प्रल्हाद मुऱ्हाडेला (वय २९, नांदी, ता. अंबड, जिल्हा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फुटलेल्या पेपरच्या स्क्रीनशॅाट्समध्ये त्याचे नाव होते. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी त्याचा माग घेतला. तांत्रिक विश्‍लेषणातून त्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रवींद्र कारेगावकर (वय ५१) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विर्निदीष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी ३१ ऑक्‍टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली होती. या प्रकाराद्वारे शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्यात मुऱ्हाडे अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीत मुऱ्हाडे याचे नाव समोर आले होते. अटक केल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तींचे नावे सांगत आहे. या गुन्ह्यातील आरोपींची साखळी शोधण्याचा तपास सध्या सुरू आहे. आरोपीला हे पेपर कोणी पुरवले, त्याने ते कोणाला पाठवले, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. हा सर्व कट कसा करण्यात आला याची माहिती घेतली जात आहे.

डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT