Pune-Health
Pune-Health 
पुणे

#PuneHealth वातावरण बदलले, आजार वाढले

सकाळवृत्तसेवा

शहरात स्वाइन फ्लू, डेंगी, चिकुनगुनियाबरोबरच इतर विषाणूंच्या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

पुणे - सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी असलेले रुग्ण प्रत्येक घरात आढळत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामान बदलत आहे. सप्टेंबरच्या शेवटी पडलेला पाऊस, त्यानंतर वाढलेला उकाडा, ‘ऑक्‍टोबर हीट’च्या चाहुलीमुळे उन्हाचा वाढलेला चटका आणि आता त्यात अधूनमधून पाऊस पडत आहे. गेला महिना-दीड महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यातून विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

गणपती पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यातून विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढते, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 
याबाबत डॉ. समीर तांबे म्हणाले, ‘‘गणपतीनंतर शहरात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी गर्दीत न जाता घरी विश्रांती घ्यावी. सामान्य फ्लू आणि स्वाइन फ्लू याची लक्षणे सारखीच आहे. तशीच ती डेंगीचीही आहेत. त्यामुळे अचूक निदान आणि योग्य उपचाराची गरज असते. त्यासाठी ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.’’

डॉ. सागर देशमुख म्हणाले, ‘‘ताप, सर्दी, खोकल्यामुळे रुग्णाला जेवण जात नाही; पण त्यातून अशक्तपणा येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळांनी रुग्णांना घरातील अन्नपदार्थ खावे.’’

संध्याकाळी कार्यालयातून घरी आलो तेव्हा व्यवस्थित होतो. रात्री अचानक थंडी वाजू लागली, ताप आला, डोकं दुखू लागलं. अचानक काय झालं कळायला तयार नाही. रात्रीत ताप वाढत गेला. सकाळी डॉक्‍टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी रक्त तपासण्याचा सल्ला दिला.
- सागर ठोंबरे, रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT