Rupali Chakankar Sakal
पुणे

Ashadhi Wari : वारीत यंदा महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी, विसावा कक्षाची सुविधा

यंदाच्या पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

यंदाच्या पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतला आहे.

पुणे - यंदाच्या पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतला आहे. यानुसार आयोगाच्यावतीने आरोग्यवारी' अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत महिला वारकऱ्यांसाठी विसावा कक्ष, न्हाणीघर, शौचालये, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन विक्री करणारी व वापरलेले सॅनिटरी नॅपकिन नष्ट करणाऱ्या मशिनची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

महिलांसाठीच्या या आरोग्यवारी अभियानाची सुरवात पुण्यातील मुक्कामात पालखीचे विसावास्थळ असलेल्या विठोबा मंदिरात येत्या रविवारी (ता.१९) चाकणकर यांच्या हस्ते केली जाणार आहे. यावेळी खासदार ॲड. वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. या महिलांची गैरसोय टाळण्यासाठी ही 'आरोग्यवारी' हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासन हे वारी काळात वारकरी महिलांसाठी दर दहा ते वीस किलोमीटर अंतरावर शौचालयांची व न्हाणीघराची सोय उपलब्ध करून देणार आहे. शिवाय सॅनिटरी नॅपकिनची पुरवठा करणारी व नष्ट करणारी मशिन उपलब्ध करून देणे, स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत महिलांची आरोग्य तपासणी करणे, सुरक्षिततेकरिता पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, मंदिर परिसरात दर्शनी भागात हेल्पलाइन क्रमांक लावण्याच्या सूचना दिल्या असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

महिला वारकऱ्यांसाठी यंदाच्या वारीत आरोग्यवारी सुरु करण्याबाबत राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतला आहे. या संकल्पनेला पुणे, सातारा आणि सोलापूर या तीनही जिल्हा प्रशासनांनी सकारात्मक प्रतिसाद देत, महिलांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महिलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबतच्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे.

- रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT