खासदार डॉ. अमोल कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे  sakal
पुणे

Pune : चिकित्सा कलाकृतींची नको इतिहासाची हवी; खासदार डॉ. कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ईश्वराची भक्ती कोणत्या मार्गाने केली, यापेक्षा कोणत्या भावाने केली हे महत्त्वाचे असते. तसेच, इतिहासाचा जागर करण्यासाठी माध्यम नाही तर भाव महत्त्वाचा आहे. म्हणून ऐतिहासिक कलाकृती ऐवजी इतिहासाकडे चिकित्सक वृत्तीने पाहायला हवे, असे मत खासदार आणि सिनेनाट्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

विश्वास पाटील लिखित महासम्राट या कादंबरी मालिकेच्या ‘रणखैंदळ’ या दुसऱ्या खंडाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. आगरकर रस्त्यावरील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेत प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वास पाटील, अखिल मेहता उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पस्तिशीच्या उंबरठ्यावरील पराक्रमांची अर्थात रणखैदळीची ही गोष्ट आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले,‘‘आम्ही इतिहासात रमत असल्याचे अनेक जण बोलतात. पण आत्मभान आणि स्वाभिमान जागृत झाला नाही. तर राष्ट्र निर्माण होते. त्यामुळे लोककल्याणासाठी राष्ट्रभान जागविणाऱ्या इतिहासाचा जयघोष करायला हवा. आपण महाराष्ट्राच्या सीमेपलीकडे शिवाजी महाराज पोचवू शकलो नाही. याची खंत आहे.

या पुस्तकाच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील जागतिक दर्जाच्या सशक्त पटकथेची निर्मिती झाली आहे.’’ रणखैंदळ ही कादंबरी आचार्य अत्रेंना अर्पण करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कर्नाटकात शहाजी महाराजांची विदीर्ण अवस्थेतील समाधी पाहून महाराष्ट्रात भूकंप होईल, असे वाटले होते.

पण दुर्दैवाने तसे झाले नाही कारण आजचा महाराष्ट्र झोपला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या ध्यासाचा, अभ्यासाचा आणि काळजाचा विषय आहे. त्यामुळे ही कादंबरी मालिका लिहीत आहे. खरं तर संशोधन मांडायचे होते. पण जनसामान्यांसाठी कादंबरीच हवी.’’

छत्रपतींवर वेब सिरीजचा मानस..

आपल्याला ‘गेम ऑफ थ्रोन’ बद्दल माहीत आहे. पण जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज आपण पोचवू शकलो नाही, याची खंत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. छत्रपतींची शौर्यगाथा वेब सिरीजच्या माध्यमातून मांडण्यासाठी महासम्राट कादंबरीची मालिका उत्तम सशक्त पटकथा आहे. आपण नक्कीच मिळून यावर काहीतरी करूयात, अशा मानस डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT