सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २७ : पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याच्या घटनेतील संशयित ससून रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. अल्पवयीन मुलाने १९ मे २०२४ रोजी भरधाव मोटार चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात आयटी क्षेत्रातील युवक-युवतीचा मृत्यू झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आदित्य सूद, आशिष मित्तल आणि अमर गायकवाड यांना जामीन दिला होता. अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांसाठी खरेतर मोटारीची चावी देणाऱ्या पालकांना जबाबदार धरले पाहिजे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळाला आहे, या पार्श्वभूमीवर आपल्यालाही जामीन द्यावा, अशी विनंती डॉ. तावरे यांनी केली होती. याचिकेची दखल घेत न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.