Pune Hoarding sakal
पुणे

Pune Hoarding : बनवाबनवी होणार उघड ; पुण्यातील प्रत्येक होर्डिंगचा फोटो, अहवाल देण्याचा आदेश

होर्डिंगला परवानगी देताना कागदावर सर्व नियमांचे पालन झालेले असते; पण प्रत्यक्षात अनेक नियमांचे उल्लंघन केलेले असते. तरीही अशा होर्डिंगला प्रशासनाकडून अभय दिले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ६ : होर्डिंगला परवानगी देताना कागदावर सर्व नियमांचे पालन झालेले असते; पण प्रत्यक्षात अनेक नियमांचे उल्लंघन केलेले असते. तरीही अशा होर्डिंगला प्रशासनाकडून अभय दिले जात आहे. त्यामुळे आता सर्व आकाशचिन्ह निरीक्षकांना राज्य सरकारची २०२२ ची नियमावली समजावून सांगितली असून, शहरातील प्रत्येक अधिकृत होर्डिंगचा फोटो आणि त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आकाशचिन्ह निरीक्षकांनी केलेली बनवाबनवी उघड होणार असल्याने धाबे दणाणले आहेत.

घाटकोपर येथे होर्डिंग पडून अनेक नागरिकांचा जीव गेला. या घटनेनंतर पुणे महापालिकेने शहरातील होर्डिंगवर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार कारवाई सुरू झाली; पण होर्डिंग व्यावसायिकांनी त्यास विरोध केल्याने कारवाई थंडावली आहे. चुकीच्या पद्धतीने होर्डिंग उभे केल्याने नागरिकांच्या जिवाला धोका कायम असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने गुरुवारी आकाशचिन्ह विभाग व क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पुणे शहरात महापालिकेने परवानगी दिलेले दोन हजार ५९८ होर्डिंग आहेत; पण चौकाचौकात, रस्त्यावर एकाच इमारतीवर अनेक होर्डिंग उभे आहेत. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झालेले असले; तरी महापालिकेची परवानगी असल्याचे सांगून त्यावर कारवाई केली जात नाही. याची आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दखल घेऊन नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने कारवाईसाठी पाऊल उचलले आहे.

१५ क्षेत्रीय कार्यालयांच्या आकाशचिन्ह निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील प्रत्येक होर्डिंगचा फोटो काढून, लेखी अहवाल सादर करायचा आहे. त्यामध्ये २०२२च्या नियमावलीतील कोणत्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. त्याचे स्पष्ट उल्लेख असणे आवश्‍यक आहे. यामध्ये चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास आकाशचिन्ह निरीक्षकावर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. तसेच धोकादायक होर्डिंग पडून जीवितहानी झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ केले जाईल, अशा इशारा आयुक्त भोसले यांनी बैठकीत दिला.

...अशी लढवली शक्कल

नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग उभी आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी काही कर्मचाऱ्यांना शहराच्या विविध भागांतील होर्डिंगचे फोटो काढून आणण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी सुमारे १५० फोटो काढले, त्यातील अनेक होर्डिंग नियमबाह्यपणे उभे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता सर्व दोन हजार ५९८ होर्डिंगचे फोटो काढून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. होर्डिंग उभे करण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडणाऱ्यांवरही कारवाई होईल, असे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT