पुणे

अधिकृत होर्डिंगना हंगामी मान्यता

CD

पुणे, ता. ८ : जाहिरात फलकांचे अंतिम शुल्क निश्‍चित होईपर्यंत शहरातील अधिकृत होर्डिंगधारकांना तात्पुरती हंगामी मान्यता देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी याबाबतचे आदेश दिले असून, यामुळे रखडलेल्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरातील जाहिरात शुल्काबाबत अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने परवाना नूतनीकरण रखडले होते. याची दखल घेत प्रशासनाने एक एप्रिल २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शुल्क ठरल्यानंतर व्यावसायिकांना फरकाची रक्कम भरावी लागेल.
या तात्पुरत्या मान्यतेसाठी पात्र होर्डिंगधारकांना ४५ दिवसांत परवाना विभागाकडे कागदपत्रे सादर करावी लागतील. यात मूळ परवाना, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र, जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि ४५ फुटांवरील फलकांसाठी अग्निशमन दलाचा दाखला अनिवार्य आहे. मुदतीत कागदपत्रे न दिल्यास होर्डिंग अनधिकृत ठरवून कारवाई केली जाईल. दरम्यान, महापालिकेने परवानगी न दिलेले, न्यायालयाने पाडण्याचे आदेश दिलेले, विमानतळ प्राधिकरणाचे नियम मोडणारे किंवा सार्वजनिक सुरक्षेला घातक असणाऱ्या फलकांना ही सवलत लागू नसेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT