पुणे

तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांना १० वर्षे सक्तमजुरी

CD

पुणे, ता. ९ : घरासमोर हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. आर. अग्रवाल यांनी हा निकाल दिला.
अमोल बाळासाहेब बोरकर (वय ३३) आणि सागर विजय काळे (वय ३३, दोघे रा. काळेपडळ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाच्या रकमेतून ८० हजार रुपये जखमी प्रतीक सकपाळ (वय २०) याला द्यावे, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. २५ जून २०१८ रोजी काळेपडळ परिसरात ही घटना घडली होती. याप्रकरणी मारुती सकपाळ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
प्रतीक हा त्याच्या मित्राला भेटायला गेला असताना आरोपींच्या घरासमोर हॉर्न वाजवत होता. यावरून तो मामाच्या मुलीची छेड काढत असल्याचा गैरसमज आरोपींनी करून घेतला. त्या रागातून त्यांनी हडपसरमधील ग्लायडिंग सेंटर येथे प्रतीकला धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आरोपींना कमाल शिक्षेची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT