पुणे

हडपसरमध्ये रुग्णालयात एकाला मारहाण

CD

पुणे, ता. ५ : रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी महिलेसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रमीत राकेश गुप्ता (वय ३५, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर; मूळ रा. जिंदल ग्लोबल सिटी, हरियाणा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इब्राहिम शेख, मुन्ना शेख, गुड्डू शेख, खलिजा शेख यांच्यासह सात जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचे नातेवाईक हडपसर परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुप्ता हे शनिवारी (ता. ३) सकाळी सातच्या सुमारास मित्रांसह रुग्णालयाच्या बिलिंग विभागात पैसे भरण्यासाठी थांबले होते. त्यावेळी बुरखा परिधान केलेली एक महिला आणि तिचे नातेवाईक बिलिंग विभागात आले. रुग्णालयाच्या बिलावरून त्यांचा कर्मचाऱ्यांशी वाद सुरू होता. या वेळी त्यांनी रुग्णालयाच्या आवारात शिवीगाळ केली.
गुप्ता यांनी त्यांना शिवीगाळ करू नका तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करू नका, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी गुप्ता यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेनंतर गुप्ता यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेकायदा जमाव जमविणे आणि मारहाण केल्याप्रकरणी महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक फाटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT