Bhagat singh Koshyari sakal
पुणे

पुणे : मानवी उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालावी

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे मत ;सव्वा लाख श्रीमद भगवदगीतेच्या प्रतीचे वाटप

जनार्दन दांडगे, लोणी काळभोर

लोणी काळभोर : राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाचा एकत्रिकरणातून शिक्षण प्रदान करावे तसे भगवतगीतेमध्ये सुद्धा ही शिकवण दिली आहे. असे झाल्यास स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्या प्रमाणे २१ व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मांडले.येथील माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती घुमटाचा विश्वार्पण, श्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवनाचा लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.

यावेळी संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. स्वाती चाटे कराड, डॉ. सुचित्रा नागरे- कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. आर. एम चिटणीस आणि डॉ. मिलिंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यापुढे बोलताना म्हणाले, " विदयार्थ्यांनी आध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात मग्न रहावे. डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती संदेश देत आहेत, तर दुसरीकडे या यज्ञाच्या रक्षणासाठी धर्नुधारी अर्जुनाची गरज आहे. साधू-संतांच्या त्यागाने भारतीय संस्कृती अमर आहे. नव्या युगात विज्ञान आणि आध्यात्माचा योग व्हावा.विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. धर्माचे तत्व सांगणारा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भगवदगीता ज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून भारत विश्वगुरू बनेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुद्धा आध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय असल्याचे त्यांनी सांगितले.प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,“अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा आज जगाला अर्पण करत आहोत. जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी पाहिले होते, ते सत्यात उतरण्याची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला साथ देत एमआयटी ग्रुप श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती वाटप केल्या आहेत.प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले. येथील एमआयटी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवर. मानवी उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालावी : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे मत ; सव्वा लाख श्रीमद भगवदगीतेच्या प्रतीचे वाटप

राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाचा एकत्रिकरणातून शिक्षण प्रदान करावे तसे भगवतगीतेमध्ये सुद्धा ही शिकवण दिली आहे. असे झाल्यास स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्या प्रमाणे २१ व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मांडले येथील माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती घुमटाचा विश्वार्पण, श्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवनाचा लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.

यावेळी संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. स्वाती चाटे कराड, डॉ. सुचित्रा नागरे- कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. आर. एम चिटणीस आणि डॉ. मिलिंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यापुढे बोलताना म्हणाले, " विदयार्थ्यांनी आध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात मग्न रहावे. डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती संदेश देत आहेत, तर दुसरीकडे या यज्ञाच्या रक्षणासाठी धर्नुधारी अर्जुनाची गरज आहे. साधू-संतांच्या त्यागाने भारतीय संस्कृती अमर आहे. नव्या युगात विज्ञान आणि आध्यात्माचा योग व्हावा.विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. धर्माचे तत्व सांगणारा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भगवदगीता ज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून भारत विश्वगुरू बनेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुद्धा आध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय असल्याचे त्यांनी सांगितले.प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा आज जगाला अर्पण करत आहोत. जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी पाहिले होते, ते सत्यात उतरण्याची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला साथ देत एमआयटी ग्रुप श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती वाटप केल्या आहेत.प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.येथील एमआयटी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT