Social Service Organization sakal
पुणे

Pune : दुर्बल घटकांच्या मदतीसाठी मानवतावादी एक पाऊल पुढे

मानवतावादी समाजसेवा संघटनेचा वर्धापनदिन

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : मानवतावादी संघटनेने माणुसकीचे दर्शन कोरोना महामारीमध्ये घडविले. गतिमंद, अनाथाश्रम आणि गरजूंना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याची तळमळ त्यांच्या कार्यातून दिसून आली. सभासदांबरोबर समाजातील दुर्बल घटकांसाठी धावून जाणारी मानवतावादी संघटना असल्याचे मत विनोदशेठ दुगड यांनी व्यक्त केले.

मानवतावादी समाजसेवा संघटनेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त शिक्षक भवनमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गफ्फार खान, माजी शिक्षण उपसंचालक सदाशिव पेटकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे, संघटनेचे कार्याध्यक्ष अरविंद पिल्ले, उपाध्यक्ष प्रकाश रावळकर, खजिनदार सईद शेख, मेहमूदशा भंडारी,

दत्तात्रय भोसले, दत्ता कदम, बाळू बारवकर, पदमाकर बांडे, नेताजी सोलवत, ट्रस्टी वासुदेव जांभेकर, सुरेश इथापे, सुभाषशेठ दुगड, सफिया खान, प्रकाश कात्रेला उपस्थित होते. यावेळी सामाजिक, क्रीडा, उल्लेखनीय काम केलेल्या सदस्य सर्वस्वी जयश्री सास्वीहळ्ळी, सनोबर खान यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

माजी गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सईद शेख यांनी आभार मानले. संस्थेचे सचिव अशोक जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील वर्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT