Murder
Murder Murder
पुणे

पुणे : पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रात्री मुले जेवण करत असताना पत्नी बडबड करत असल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना रविवारी रात्री काशेवाडी येथील अशोक नगर कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आस्मा तौसीफ हवारी (वय 35, रा. अशोकनगर, काशेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तौसिफ नुरहसन हवारी (वय 37) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ हा केशकर्तनलायाच्या दुकानात कामाला आहे. तो त्याची पत्नी आस्मा, 13 वर्षांची मुलगी व 10 व सात वर्षाची दोन मुले असे पाच जण लोहियानगरमध्ये राहतात. तौसिफ हा रविवारी दिवसभर काम करुन रात्री घरी आला. त्यावेळी रात्री मुलांना जेवण देताना पत्नी आस्मा बडबड करत होती. त्या कारणावरुन पतीने तिला लाथाबुक्‍यांनी जबर मारहाण केली. पोटावर मार बसल्याने तिला त्रास झाला. भांडणे मिटल्यानंतर सर्वजण रात्री झोपले. सोमवारी सकाळी तौसिफने पत्नी आस्माला आवाज दिला.

मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ती निपचीत पडली होती. तसेच शरीर ही थंड पडल्याने त्याने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्याबाबत पोलिसांनाही खबर मिळाली. प्राथमिक तपासात रात्रीच्या पती पत्नीच्या भांडणात तौसीफने मारहाण केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आस्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT