pune sakal
पुणे

'मी भला, माझे काम भले', अजित पवारांनी सोमय्यांवर बोलणे टाळले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'मला भरपूर कामे आहेत. कोणी काहीही बोलत बसेल. मला त्यावर बोलायला वेळ नाही,' असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत बोलणे टाळले.

मांजरी (जि. पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) मंगळवारी संचालक मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्यकारी अधिकारी संभाजी कडू पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

राज्यात सध्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते काय बोलतील याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. परंतु बैठकीनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी काही न बोलता निघून गेले. त्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.

पत्रकारांनी उपमुख्यमंत्री पवार यांना सोमय्या यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, 'कोणीही काहीही बोलत बसतील. त्यावर बोलायला मला काही मोकळा वेळ नाही. मला भरपूर कामे आहेत. मी भला आणि माझे काम भले,' असे म्हणत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जाताना 'चला जयंतराव' म्हणत त्यांना गाडीत बोलावले. त्यानंतर वळसे-पाटील यांनी दादा नाही बोलले, मी काय बोलणार, असे म्हणत तेही रवाना झाले. आमदार रोहित पवार यांनी मी कोणत्या विषयावर बोलणार, असे म्हणत त्यांनीही काढता पाय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT