पुणे

गर्भलिंग तपासणी रॅकेटचा मुद्दा विधानसभेत गाजला

CD

केडगाव, ता. २४ : पुणे जिल्ह्यातील गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणावरून आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. यावर दोषींवर कठोर कारवाईसह ''पीसीपीएनडीटी'' कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी बुधवारी (ता. २४) दिले.
पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर, भोर आणि हवेली तालुक्यात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कुल यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. ग्रामीण भागात वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्ती डॉक्टरांच्या संगनमताने पोर्टेबल मशीनद्वारे हे रॅकेट चालवत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हा प्रकार स्त्री-पुरुष गुणोत्तर बिघडवणारा असून महिलांच्या सन्मानाला धक्का देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार कुल यांनी या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी ''गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम, १९९४'' (पीसीपीएनडीटी) मध्ये कठोर सुधारणा करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांना अधिक अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार का, असा सवालही उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि कायद्यात सुधारणा करण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT