पुणे

बेकायदा जाहिरात पडली ३० लाखांना

CD

पुणे, ता. १६ : पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे सर्व नियम पायदळी तुडवत पथदिव्यांवर बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या वडगावशेरीतील बांधकाम व्यावसायिकाला प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. त्याला ३० लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दुसऱ्या कारवाईत आणखी एकाला दीड लाखाचा दंड केला आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने जाहिराती करणाऱ्या व्यावसायिकांना चाप बसला आहे.
पुणे शहरात होर्डिंग, बॅनर लावायचे असल्यास महापालिकेची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळते आणि त्यावर नियंत्रणही ठेवता येते. मात्र अनेक राजकीय पदाधिकारी, शिक्षण संस्था, बांधकाम व्यावसायिकांसह अन्य व्यक्ती व संस्था शहरात बेकायदा जाहिरात फलक उभारतात. मोठे शुल्क मोजावे लागत असल्याने व्यावसायिक आकाशचिन्ह विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बेकायदा होर्डिंग उभारतात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते.

पथदिव्यांवर जाहिरात लावण्यास बंदी
महापालिकेच्या पथदिव्यांवर जाहिरात लावण्यास बंदी आहे. मात्र अनेक शिक्षण संस्था, खासगी क्लासेस, बांधकाम व्यावसायिक बेकायदा दुभाजकाच्या आतमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदिव्यांवर २ बाय ४, ३ बाय ५ या आकाराचे जाहिरात फलक लावतात. वाहनचालकांचे या जाहिरातींकडे लक्ष जाते आणि संबंधितांना प्रसिद्धी मिळते. पण वाहनचालकांचे लक्ष विचलित झाल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पथदिव्यांवर जाहिरात लावण्यास बंदी आहे. असे असताना पुण्यातील दोन मोठ्या नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी या नियमांकडे दुर्लक्ष केले.

कारवाईनंतर पुन्हा लावले फलक
वडगावशेरी व मगरपट्टा भागातील बांधकाम व्यावसायिकांनी पथदिव्यांवर जाहिरात फलक लावले होते, त्यावर महापालिकेने कारवाई केली होती. पण त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जाहिराती लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रति जाहिरात फलक प्रतिदिन दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वडगावशेरीतील बांधकाम व्यावसायिकाने येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नगर रस्त्यावर ७ ते ३१ ऑगस्टदरम्यान ३ बाय ५ आकाराचे ६१ जाहिरात फलक लावले होते. त्यानुसार त्याला ३० लाख ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मगरपट्टा येथील बांधकाम व्यावसायिकाने ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान २५ फलक लावले होते. त्यास प्रतिदिन दोन हजार रुपयांप्रमाणे एक लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


पथदिव्यांसह अन्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक लावता येत नाहीत. अशा जाहिरात फलकांवर कारवाई केल्यानंतर पुन्हा जाहिरात लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही दोन बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली. ही रक्कम त्यांनी सात दिवसांत भरली नाही तर त्याचा बोजा त्यांच्या मिळकतींवर चढवून ही रक्कम करामधून वसूल केली जाईल.
- संदीप कदम,
उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग

तुमचे मत मांडा...
पुणे महापालिकेने पथदिव्यांवर बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या व्यावसायिकांना दंड ठोठावला आहे. अशीच परिस्थिती तुमच्याही भागात आहे का? याबाबत तुमचे मत मांडा...
ला प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT